सी.एन.देशमुख
नाशिक
आदरणीय वेरुळकर सर,
सप्रेम नमस्कार व
अभिनंदन !...
आपण विवाह जुळवण्याच्या कामाचे शतक पूर्ण केले.खरेतर विवाह जुळवण्याचे काम धावपळीच्या युगात किल्ष्ट होत चालले आहे. अशा परिस्थितीत आपले कार्य खरोखरच महत्त्वपूर्ण व वधू-वर पालकांना पथदर्शक आहे,..
आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा!...
पुनश्च आपले व ग्रुपचे अभिनंदन !
शुभेच्छुक -
सी.एन.देशमुख, नाशिक
श्री.भागवत तुळशीरामजी फरताेडे, साै.गीता भागवत फरताेडे
अमरावती
आदरणिय,वेरुळकर सर
आपण नुसते वय वाढले म्हणुन किंवा पदवी ,पैशाने नव्हे तर कर्तुत्वाने, कर्तुत्व तेही समाजोपयोगी विवाह संस्था मजबुत करण्याच्या दिशेने शंभर विवाह योग जुळवून आणले तेही नि:शुल्क.खरेच आपले अंतकरणासुन अभिनंदन !आपल्या सोबत आपल्या संपुर्ण कुटुंबाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन ! तुमचे हातुन असेच समाजकार्य घडत राहो हि प्रभु चरणी प्रार्थना पुढील वाटचालीस सदिच्छा !
शुभेच्छुक -
श्री.भागवत तुळशीरामजी फरताेडे,(से.नि.विभागीय वनअधिकारी)
साै.गीता भागवत फरताेडे
रा.अमरावती
कैलास व्यवहारे (शिक्षक)
पाेफळी, जि बुलढाणा
नमस्कार !
माननीय श्री.षडानन वेरुळकर सर खरच तुम्ही व्हॉट्स अॅप ग्रुप मराठा समाजातील वर - वधू साठी स्थापन करुन आज रोजी शंभर लग्न त्या द्वारे जोडली सर खरोखरच आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात जो तोआपा-आपल्या पुरता मर्यादीत होत आहे कुणीही मध्यस्ती च्या भानगडीत पडायला तयार नाही त्यामूळे लग्न जुळणे व वर-वधू शोधणे फार कठीण होऊन बसले आहे परंतू तुमच्या या उपक्रमामुळे त्याला संजीवनी मिळाली सर तुम्ही आपलाअमुल्य वेळ या कामी खर्च करुन समजा मधे एक आदर्श निर्माण केला ह्या बद्दल संपूर्ण मराठा समाज आपला ऋणी आहे. धन्यवाद !
शुभेच्छुक -
कैलास व्यवहारे (शिक्षक)
पाेफळी, जि बुलढाणा
विक्रम सोळंके सर
नांदेड
वेरुळकर सरजी...
आपले तिवार अभिनंदन!!
दैनंदीन जिवनातील अमुल्य वेळ देऊन अतिशय व्यस्त असणार्या तरूणाईला मनासारखा जोडीदार मिळऊन देण्याचे बहूमुल्य परिसासारखे त्यांचे जिवन उजळण्याचे काम आपण करीत आहात. नेहमी,नेहमी सुचना देत,त्यांचे बायोडाटे मागऊन फोटोसह एकत्रीत करून सर्व ग्रुप वरती पोस्ट करण्यासाठी दररोज आपण आॅनलाईन आसता. खरंतर आपण मानव रुपी देवचं आहात. कारण इतका वेळ देण्यासाठी ईश्वरी अंशच लागतो. तो आपल्यात मला जाणवतो. तुम्ही ध्येयवेडे आहात. तुमच्या वेडेपणाने अनेकांच्या संसारात सुख, समाधान,गोडवा, आनंदी जीवन जगण्याची ऊर्जा नव तरुणांना मिळंत आहे.जया अंगी मोठेपण तया यातनां कठीण या न्यायाने ईतका वेळ समाजासाठी देत असताना ताईचं पण तुम्हास सहकार्य आहे.करीता तुम्हा परीवारस नांदेड जिल्ह्यच्या वतीने मानाचा मुजरा करतो आणि आपले पुन्हा एकदा अभिनंदन करतो.
विक्रम सोळंके सर
ऊमरी .नांदेड.
साै.वंदना रुपराव ताेटे
वाशिम
वेरुळकर सर
आपण समाज हिताच्या दृष्टीने खुपच चांगले काम करत आहात या धावपळीच्या युगात विवाह जुळविणे कठीण तर आहेच परंतु आपण असाध्य असलेले काम साध्य करून दाखविले तेही निस्वार्थ पणे ! परमेश्वर आपणास आपल्या कुटूंबास उदंड आयुष्य व सुख समृध्दी देवो हिच प्रभू चरणी प्रार्थना करते ! १०० लग्न आपल्या माध्यमा द्वारे जुळले करीता समस्त तोटे परिवारांकडून अनंत हार्दिक शुभेच्छा ! व आपले हार्दिक अभिनंदन !
शुभेच्छुक -
साै.वंदना रुपराव ताेटे
मुख्याध्यापिका, न.प.शाळा,वाशिम
शिवा धाबे
अमरावती
षडानन ••••••••••••••••••
ध्येयवेडाच म्हणाव लागेल तुला ! खरचं खूप आनंद वाटतो मनाला. तुझ्यावर होणारा शुभेच्छांचा वर्षाव वाचताना अभिमान वाटतो ! या शुभेच्छांमध्ये तुझ्या मनातला आनंद वाचत होतो मी ! परिवाराला मिळणारे आशिर्वाद अनुभवत होतो मी ! आणि सहजच गर्वाने छाती फुगवल्यागत वागायला लागलो मी !
कुठलेही काम पोट भरून करण्याच्या सवयी पुढे नतमस्तक व्हावं.व सुखाच्या लाटेत सोबतीने मनसोक्त आनंद लुटावा एवढेच मागणे मागतो परमेश्वराला ! समाजिककार्य करताना लागणारी चिकाटी तुझ्यात असल्यामुळेच आज ही शतकपुर्ती अनुभवतो आहे. एकशे एक जुळलेली लग्न, निशुल्क सेवा, ऑनलाइन दिनचर्या, व मुक्ता वहिनींची विषेश कौतुक पुर्ण मदत हे सर्व निश्चितच कौतुकास्पद आहे करिता तुम्हा उभयतांचे मनस्वी अभिनंदन ! तुझा वर्ग मित्र बंधू •••••••••••
शिवा धाबे, अमरावती
साै.कांचन व श्री.हर्षल पाटील
मुंबई
मराठा समाजभूषण श्री.षडानन वेरुळकर सर नमस्कार सर !
मी कांचन काटे (पाटील) बाेलतेय ! मी आपले ग्रुप मधूनच सुहासिनी झाली आहे !
खराेखरच मला खूप आनंद झाला की,आपण दि.१/१/२०१७ ला लावलेले राेप अल्प कालावधीत वटवृक्ष झाले या वटवृक्षाची संसाररुपी छाया लाखों मराठा समाज बांधवांना मिळेल ! त्या छायेचा शितल गारवा उपवर-वधुंना मिळेल ! आणि त्यांचे पुण्य आपल्या सहपरिवारा ला मिळेल ही आम्ही नव वधू-वर प्रभु चरणी प्रार्थना करताे !
सर Whats app ग्रुप ची शिस्त बध्द प्रणाली आपणच करावी ! हे कार्य एवढे साेपे नाही ? पालकांपेक्षा ही आपण प्रत्येक मुला-मुलींची खुप काळजी घेता प्रत्येकाचे परीचय पत्र व फाेटाे एकत्रित करून ग्रुप वर पाठविता ! परीचय पत्र स्पष्ट दिसत नसेल ,फाेटाे लग्न करीता योग्य नसेल तर व्यक्तीगत सुचना पाठविता सुचनेनुसार आपले समाधान नाही झाले तर प्रत्यक्ष पालकांना फाेन करता. सर आपण बारकाईने ग्रुप वर लक्ष ठेवून कार्य करत आहात जसे शाळेत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवता तसेच बाहेर उपवर-वधु यांचे वर लक्ष ठेवता. सर मला हे सर्व माहिती आहे कारण मी ग्रुप चे राेप लावले तेव्हापासून तुमच्या ग्रुप चे निरीक्षक म्हणून काम पाहते आहे ! आपल्या प्रमाणेच मी ग्रुप सभासदांचे सुध्दा निरीक्षण केले आहे आज पावेतो तुम्हाला १०० सभासदांनी लग्न जुळल्याचे साेयरीक चे फाेटाे पाठवून कळविले आणि तुम्ही सुध्दा त्यांचे अभिनंदन करुन शुभविवाहा करीता त्यांना शुभेच्छा दिल्या हे सर्व ठीक आहे सर परंतु काही सभासदांनी लग्न जुळले हे तुम्हांला कळविलेच नाही त्याचं काय ? आज आपले एकच शतक पूर्ण झाले नाही आपले दाेन शतकं पुर्ण झाली आहेत सर !
मला मराठा समाज बांधवांना हेच सांगायचे आहे की "गरज सराे वैद्य मराे " ही भुमिका करु नका ! या कार्या चे समाज सेवक दुर्मिळ झाले आहेत ? विचार करुन निर्णय घ्या !
आपले लग्न जुळणे आणि आपण सरांना साेयरीक चा फाेटाे पाठविणे म्हणजे च सरांना नाेंदणी शुल्क मिळाल्या चा आनंद मिळताे !
मी मराठा समाज बांधवांना आवाहन करते की, प्रत्येक सभासदांनी आपले कर्तव्य समजून आपले उपवर-वधू चे लग्न जुळले की साेयरीक चा फाेटाे व दाेघांची माहिती किंवा दाेघांचे परीचय पत्र सरांना त्वरित पाठवा. आपल्या ग्रुप चा एक उमेदवार व दुसरा उमेदवार आपल्या ग्रुप चा जरी नसेल तरी आपल्याला कळवायचे आहे कारण आपले उमेदवाराचे परीचय पत्र व फाेटाे आपण अनेक वेळा ग्रुप वर पाठविले आहे ! त्या करीता आपले लग्न जुळले आहे हे लोकांना कळविणे आपले आद्य कर्तव्य आहे !
खराेखरच समाज सेवा यालाच म्हणतात ! जी सेवा नि:शुल्क व अहाेरात्र सेवा आहे ! हीच समाज सेवा ईश्वर ला मान्य आहे !
तसेच मराठा समाज बांधवांना मी सांगू इच्छिते की आपले उपवर-वधु मुला-मुलींना सुध्दा या ग्रुप मध्ये समाविष्ट करा कारण हा ग्रुप फक्त मराठा समाजाच आहे. शिवाय या ग्रुप चा सारथी एक मराठाच आहे तर मग आपले मुला-मुलींना बघू द्या की आपला याेग्य जीवनसाथी !
आपण सर्वांनी सरांना खूप छान छान आपले मनाेगत कळवून काेटी काेटी शुभेच्छा दिल्या आहेत ! मी काय लिहीणार नुकतच लग्न झालयं माझं तरी पण थाेडसं लिहीलं चूक असल्यास क्षमा असावी तसेच सरांना या कार्यासाठी काही आर्थीक मदत पाहीजे असल्यास मी केव्हाही आर्थीक मदत करण्यासाठी तयार आहे. त्याच बरोबर आमचे पाटील परीवरांकडून सरांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा व सरांचे व मुक्ताताई चे मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन !
शुभेच्छुक -
साै.कांचन व श्री.हर्षल पाटील
मुलुंड, मुंबई
गजानन काटे
अकोला
समाजभूषण,आदरणीय व सन्माननीय श्री.वेरुळकर सर,
माझी भाची कु. शितल महादेवराव गीते, रा.भंडारज, ह मु. सिरसोली,जि.अकोला B. E. COMPUTER व चि. निकेत संतोषराव लोखंडे पाटील,B. E. COMPUTER रा. बेंभाडा, जि.बुऱ्हाणपूर यांचा विवाह आपल्या Whats app ग्रुप च्या माध्यमातून जुळला आहे व साक्षगंध कार्यक्रम संपन्न झाला आहे.सर, आपण समाजातील एकमेकांना अनुरुप अशा दोन जीवांच्या मनोमिलनाचे अनमोल असे कार्य करीत आहात. आपलं खुप खुप अभिनंदन व आपल्या ह्या कार्यास खुप खुप शुभेच्छा !
आपल्या उच्चविद्याविभूषित कुटुंबाची सर्वच क्षेत्रात प्रगती होवो व आपले हातुन हे कार्य असेच अखंडित सुरु राहो ह्या करिता ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना !
धन्यवाद !
आपला स्नेहांकीत -
गजानन काटे
लहान उमरी,अकोला
श्री.संतोष पाटील व सौ.लता पाटील, सहपरिवार
पुणे
नमस्कार !
मराठा समाज भूषण मा.श्री.षडानन वेरूळकर सर खरच तुम्ही व्हॉटस ऍप ग्रुप मराठा समाजातील वधू वर साठी स्थापन करून आज रोजी १०१ लग्न जोडली, खरोखरच आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात समाज आपल्या पुरता मर्यादित होत आहे कुणीही मध्यस्थी करायच्या भानगडीत पडायला तयार नाही त्यामुळे लग्न जुळणी वर-वधू शोधणे फार कठीण होऊन बसले आहे परंतु तुमच्या या उपक्रमामुळे त्याला संजीवनी मिळाली आहे तुम्ही आपल्या अमूल्य वेळ या कामी खर्च करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला ह्या बद्दल संपूर्ण मराठा समाज आपला ऋणी आहे.
धन्यवाद!
शुभेच्छुक-
श्री.संतोष पाटील व सौ.लता पाटील, सहपरिवार
कृष्णा नगर दिघी पुणे
विदर्भ मराठा समाज मंडळ पुणे
श्री केशव गारमोडे सौ संगीता गारमोडे
लासुरा
समाजभूषण, आदरणीय श्री वेरूळकर सर , आपण १०० कुटुंबाचं मिलन करून म्हणजेच विवाह लावून दिले त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन व आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा..
माणूस किती मोठा आहे हे त्यांनी किती माणसे मोठी केली यावरून ठरते....
अगदी त्याचप्रमाणे आपण १०० जोडप्यांचे विवाह जमवून दिले ही खूप कौतुकास्पद बाब आहे.
या कलियुगात अशा प्रकारचं सहकार्य मिळणं हे भाग्याच आहे आणि आम्ही सर्व समाजबांधव आपले ऋणी आहेत की आपण आम्हांस अशा प्रकारचं सहकार्य करत आहात......
आपलं हे कार्य उत्तोरोत्तर वाढत जाऊन....या कार्याचा वेल गगनाला भिडून जावो, संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत....त्याचा वेलू गेला गगणावरी।।.....
पुन्हा आपले हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
धन्यवाद...
श्री केशव गारमोडे
सौजन्य: कलासागर फोटो अँड डिजिटल कलर लॅब, बुलढाणा रोड, मलकापूर.
सौ संगीता गारमोडे
सरपंच, लासुरा