मनोगत

प्रा .श्रीधर तेजराव बाठे



नांदुरा जि.बुलढाणा



Big century!!! पदार्पणाच्या पहील्या शतकाचा आनंद हा एखादा क्रिकेट खेळाडू साठी जग जिंकल्या सारखा असतो ...... सन्माननीय श्री एस.आर.वेरूळकर सर यांच्या "शतकवीर सोयरीक" (नाबाद ) कार्याने खरोखरच समाज मन जिंकले आहे ..... शतकांची ही मालिका भविष्यात सुद्धा अशीच सुरू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना !! अभिनंदन सर !! प्रा .श्रीधर तेजराव बाठे रा.मोमीनाबाद ह.मु.नांदुरा जि.बुलढाणा

अशोक धाबे



अमरावती



श्री विठ्ठलराव बाबाराव पोहरे





सन्माननीय समाजभूषण श्री.षडानन वेरूळकर सर नमस्कार ! पुणे येथील विदर्भ मराठा समाज मंडळाने आपला सत्कार केला. त्या साठी सर्व प्रथम आपले अभिनंदन ! आपणास भेटून आम्हाला खूप आनंद झाला. व आम्हाला आपले बहूमुल्य मार्गदर्शन लाभले आजच्या धकाधकीच्या यूगात मराठा समाज हा टिकून राहावा, व आपण या मराठा समाजाचे काही देणे लागतो ,यासाठी आपली जी तळमळ आहे ती खरोखरच दिसून आली.खराेखरच आपण मराठा समाजभूषण आहात ! सभासदांना व उपवर-वधु तसेच त्याच्या पालकांसाठी पण आपण जे मार्गदर्शन केले ते खरोखरच अतिशय महत्वाचे होते. सर आपण मोकळे पणे भेटलात व आपले मनोगत व्यक्त केले त्यासाठी आम्ही सर्वच आपले व आपल्या परिवाराचे खुप आभारी आहोत. धन्यवाद ! आपले स्नेहांकित - श्री विठ्ठलराव बाबाराव पोहरे

गजानन काटे



अकोला



समाजभूषण आदरणीय व सन्माननीय श्री वेरुळकर सर, गृहस्थाश्रमात पदार्पण करतांना दोन वेगवेगळ्या कुटुंबातील दोन जीवांचे मनोमिलन होण्यासाठी नविन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून निस्वार्थपणे काम करीत आहात व आपल्या माध्यमातून लग्न जुळवण्याचे शतक पुर्ण झाले ह्या बद्दल आपलं त्रिवार अभिनंदन व आपणांस मानाचा मुजरा. गेल्या जवळपास सहा महिन्यापासुन मी ह्या ग्रुप वर बघत आहे की असा एकही दिवस गेला नाही की वधुवरांचे परिचय पत्र ग्रुपवर वेळेवर टाकले गेले नाही. सुखदुःख सर्वानाच असतं परंतु ह्या व्यस्थतेतून अव्याहतपणे दररोज ह्या समाजपयोगी कार्याकरिता निस्वार्थ व निःशुल्क आपण दररोज तीन तासापेक्षा जास्त वेळ देत आहात ही खरोखरच सर्व सभासदांसाठी अभिमानास्पद व गौरवाची बाब आहे. मध्यंतरीच्या काळात काही व्यक्तीनी ग्रुपवर समाजविघातक कार्य करण्याचा प्रयत्न केला व मोठया मनानी सरांनी ही बाब सभासदांच्या निदर्शनास आणून दिली व अभिप्राय मागितले होते. ह्या बाबीवरून सरांचे मनाचा मोठेपणा सुद्दा सिद्ध होतो. आपल्या उच्चविद्याविभूषित कुटुंबाची सर्वच क्षेत्रात प्रगती होवो व आपले हातुन हे कार्य असेच अखंडित सुरु राहो ह्या करिता ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना. धन्यवाद ! आपला स्नेहांकीत गजानन काटे लहान उमरी,अकोला

प्रा.डॉ. सुशीला धाबे



अमरावती



विवाह जुळविणे असे दिव्य मोठे परी कार्य हे नव्हेचि छोटेअमाप संधीअसती जनाल सत्कार्यास सवड साधे तुम्हाला अविवाहितांचे जाणून प्रश्न आपण जाहला होऊनि भीष्म प्रण घेतला विवाह जोडण्याचा नसे व्यर्थ प्रयास हा प्रतिज्ञेचा त्यातून सहस्त्र विवाह योग घडवून आले संधान योग्य कार्यास तुमच्या कोटी शुभेच्छा दीर्घायुष लाभो तुम्हा मनी ही सदिच्छा l शुभेच्छुक - प्रा.डॉ. सुशीला धाबे,अमरावती.

मनोहरराव बापुरावजी कोलखेडे सौ.ऊमाताई मनोहरराव कोलखेडे



अमरावती



नमस्कार ! श्री. वेरूळकर सर आपल्या व्हॉटस ऍप गृप चे माध्यमातून माझी मुलगी. कु.धनश्री B.E.,M.E. श्री मनोहररव बापुरावजी कोलखेडे रा लेहेगाव (रेल्वे) ह.मु.जागृती काॅलनी,बनोसा दर्यापूर जि.अमरावती आणि चि.सागर B.E.,M.B.A. श्री अरूणराव श्रीरामजी भोरे रा.हरम ता.अचलपूर ह.मु.गजानन धाम,साईनगर,अमरावती. यांची आपले सर्वांचे सहकार्याने लग्न सोयरीक जुळली आहे. करीता श्री.वेरूळकर सर आणि व्हॉटस ऍप ग्रुप गृप चे सर्व सदस्यांना मन:पुर्वक धन्यवाद ! शरी.मनोहरराव बापुरावजी कोलखेडे सौ.ऊमाताई मनोहरराव कोलखेडे रा.जागृती काॅलनी,बनोसा दर्यापुर जि.अमरावती.

साै.रंजना व श्री.अनिल चंडकापुरे



ठाणे



नमस्कार ! मा.श्री. षडानन वेरुळकर सर मा. साै.मुक्ताताई वेरुळकर मॅडम आपण व्हॉटस ऍप ग्रुप च्या माध्यमातून मराठा समाजा करीता एक उत्तम व शिस्तबद्ध साेयरीक मंच उपलब्ध करून दिला याच साेयरीक मंच मुळे आज माझे मुलीचे १०५ क्रमांक वर लग्न जुळले त्या करीता आपण दाेघांना मन:पुर्वक धन्यवाद ! व पुढील कार्यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा ! दि.१/१/२०१७ पासून आज पावेताे १०७ लग्न जुळवलीत ही समाज सेवा आपले हातून अखंड घडत राहाे ही प्रभु चरणी प्रार्थना ! सर्व समाज बांधवांना विनंती करताे की सरांनी सुरू केलेल्या शिस्तबद्ध उपक्रमाची शिस्त कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा हीच अपेक्षा ! तसेच मराठा बांधवांना आवाहन करताे की, या ग्रुप मध्ये जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांना समाविष्ट करा ! •••••••••••••••••••••••••••••••••• साै.रंजना व श्री.अनिल चंडकापुरे, ठाणे

Prof.Dr.Ashok Mohod & Sau.Priti Ashok Mohod





Heartly congratulations sir,as you crossed 103.By bless of god you will cross 2nd century as early as possible in nearby future.

Mrs. & Mr. Dhotre



Nashik



Hearty congratulations "Verulkar" Sir. The greatest social work by you. Maratha Samaj is proud of you. We hope the same cooperation in future also. Mrs. & Mr. Dhotre, Nashik

Satish Thakare



Mumbai



Congratulation ! for Your generous & dedicated social work for marriage proposal of Young generation. ---Shri Satish Thakare , Mumbai

Page 13 of 15