महाराष्ट्रातील सकल मराठा समाजासाठी विवाह सुचक केंद्र
संचालक : षडानन वेरुळकर
मो. : 9322820354 / 7499881909
ईमेल : admin@verulkarsakalmarathasoyrik.com
वेरुळकर सकल मराठा वधुवर सुचक केंद्र®
आमच्याविषयी
आमच्याविषयी
|| श्री संत गजानन महाराज प्रसन्न || श्री क्षेत्र शेगांव
- प्रेरणा स्त्रोत -
मी अठरा वर्षाचा असतांना म्हणजे असेल तो चाळीस वर्षांपूर्वीचा काळ, तेव्हाच्या काळात विवाह जुळवणी संदर्भात माझ्या वडिलांचे मदत कार्य मी प्रत्यक्ष पाहत होतो. माझे वडील शिक्षक होते. त्यामुळे माझे वडील नोकरीच्याच गांवी राहायचे. माझ्या वडिलांना गांव परिसरातील व आजूबाजूच्या गावातील मराठा समाजातील लोकांच्या नातेवाईकांची खूप माहिती होती. माझे वडीलांची स्मरण शक्ती खूप दांडगी होती. त्यांचा बोलण्याचा आवाज मोठा होता. आवाजा वरुन ते लोकांना न दिसताच कळायचे की, रूपचंद गोविंद वेरुळकर गुरुजी येत आहेत. शिवाय माझे वडील खूप बोलके होते, ते प्रत्येक माणसाशी स्वत:हुन बोलायचे. आणि लोकांना सुध्दा त्यांचे बोलणे खूप आवडायचे त्यामुळे खुप लोकांशी त्यांचा संपर्क होता. आणि गावातील लोकसुद्धा आपुलकीने विवाह जुळवणी संदर्भात माझ्या वडिलांकडे येत होते आणि वडील सुद्धा त्यांना स्वतःचे कार्य समजून मदत करीत असत. वेळ प्रसंगी त्यांचे सोबत जात असत. त्या वेळी सर्व गावापर्यंत जाण्यासाठी बस सेवा सुद्धा उपलब्ध नव्हती त्यामुळे कधी पायी प्रवास तर कधी बैलगाडी ने प्रवास करून संबंधितांशी संपर्क साधून दोन्ही कुटुंबातील लोकांना समजावून सांगून विवाह जुळवणीचे कार्य करण्यात मदत करीत होते. तसेच गावातील लोकांच्या कुठल्याही कार्यप्रसंगी ते आवर्जून उपस्थित राहत असत. माझ्या वडिलांच्या बोलक्या स्वभावामुळे आणि होतकरू, कष्टाळू, निस्वार्थी, धार्मिक, प्रामाणिक या सर्व वृत्तीमुळे गावातील व परगावातील बहुतेक सर्व लोकांना माझ्या वडिलांची चांगलीच ओळख होती. बरेच विवाह कार्य जुळण्यास त्यांची मदत झाली.
शेवटी वयोमानामुळे आणि प्रकृतीस्वास्थ्य बरोबर राहत नसल्यामुळे एक दिवस वडिलांनी मला जवळ बोलावून सांगितले की, षडानन तु सुध्दा समाजातील सर्व नातेवाईकांची माहिती लक्षात ठेव ही सर्व माहिती पुढे भविष्यात कामात येत असते. मुला-मुलींचे विवाह जुळवणी संदर्भात सोयरीक संबंधाचे कार्यास मदत करीत राहा आणि जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून समाजातील सर्व संबंधित लोकांच्या नातेवाईकांशी ओळख ठेवून माहिती संग्रहित करून ठेव. आणि चांगली प्रगती करून नावारूपास ये ! हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. व ते साकार करण्यासाठी मी समाजातील लोकांशी व त्यांच्या इतर नातेवाईकांशी संपर्क साधून वेळोवेळी उपवर वधू मुलामुलींच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून विवाह जुळवणी च्या कार्याची माहिती जाणून घेत होतो. कुठल्याही कार्यप्रसंगी तेथील नवनवीन लोकांशी ओळख करून घेत होतो. अशा रीतीने विवाह विषयक जुळवणी संबंधातील कार्याची परिपूर्ण माहिती झाल्यानंतर तसेच एक आनुवंशिकता म्हणून वडीलांमध्ये असलेले गुण कदाचित माझ्या मध्ये उपजतच असावे. असे मला वाटून मला एक मोठा आत्मविश्वास निर्माण झाला की, मी हे समाज कार्य करू शकतो. आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर तसेच मला वडिलांनी केलेल्या उपदेशानुसार त्यांचे स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्या दिशेने पावले उचलण्यास सरुवात केली. आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून बऱ्याच अनुभवाअंती अशा प्रकारे मला माझ्या वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणादायी उपदेशाने या समाजकार्याची आवड निर्माण झाली. आणि त्यातूनच माझ्या मध्ये हा छंद निर्माण झाला.
- कार्य आरंभ -
सकल मराठा समाजातील वर-वधु मुला-मुलींची माहिती लग्न सोयरीक करीता समाज बांधवांना मिळावी या करिता या कार्याची सुरुवात व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून दिनांक १ जानेवारी २०१७ पासून झाली आहे.
व्हाट्सअप A ग्रुप पासून A,B,C,D,E,F,G,H,I,J असे दहा ग्रुप तयार झाले आहेत. या दहा ग्रुपची एकूण सभासद संख्या २५०० आहे. व आजपावेतो या ग्रुपच्या माध्यमातून ३०० लग्न जुळली आहेत. ग्रुप च्या कार्याबद्दल ५०० आदरणीय सभासदांचे अभिप्राय व मनोगत प्राप्त झाले आहेत. लॉकडाऊन च्या काळामध्ये विनामूल्य ऑनलाईन सकल मराठा उपवर-वधूंचे ०३ परिचय मेळावे संपन्न झाले आहेत. प्रत्येक मेळाव्याला १०० उपवर-वधूं ची उपस्थिती होती. त्यामध्ये बरीच लग्न जुळली आहेत. हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुर्ण झाले आहे. त्या करीता मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
वयोमानाने माझी प्रकृती ठीक राहत नसल्यामुळे शिवाय मला डोळ्याचा व मानेचा त्रास होत असल्याने आणि वाढत्या सभासद संख्येमुळे मला व्हाट्सअप ग्रुप चे काम करणे शक्य होत नाही. त्याकरिता सभासदांच्या आग्रहास्तव सकल मराठा समाजातील वर-वधुचीं माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने व सोप्या पद्धतीने आजच्या युगात संगणक ही काळाची गरज समजून व्हाट्सअप ग्रुप चे वेबसाईट मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. करिता सर्व सकल मराठा बंधू-भगिनींनी आपले वरवधूंची नाव नोंदणी करून सहकार्य करावे, ही आपण सर्वांना नम्र विनंती करतो.
या वेबसाईटवर आलेल्या वर-वधु उमेदवारांमधून आपल्याला योग्य असलेल्या वर-वधु उमेदवाराकडे दिलेल्या संपर्क नंबरवर आपण स्वतः संपर्क करावा व स्वतः च संपूर्ण चौकशी करावी. वर-वधु उमेदवारांचे परिचय नोंदणी अर्जातील संपूर्ण माहिती बाबत व फोटोबाबत मी जबाबदार राहणार नाही. कारण ती सर्व माहिती व फोटो स्वतः उमेदवार यांनी पाठवली आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. ही आपणं सर्वांना नम्र विनंती आहे. धन्यवाद !
संचालक - श्री षडानन रूपचंद वेरुळकर
प्रेरणा स्थान
स्व. श्री रूपचंद गोविंद वेरुळकर
( सेवानिवृत्त मुख्याध्यापक )
प्रेरणा स्थान
स्व.सौ.जनाबाई रुपचंद वेरुळकर
संचालक
श्री षडानन रूपचंद वेरुळकर
( सेवानिवृत्त कलाशिक्षक )