वार्षिक नाव नोंदणी शुल्क / नुतनीकरण शुल्क : ५००/- पाचशे रुपये + बँक व्यवहार शुल्क
वार्षिक नाव नोंदणी शुल्क / नुतनीकरण शुल्क
वेबसाईट वरील ऑनलाईन पेमेंट गेट वे वरुन नेट बँकींग / डेबीट कार्ड / क्रेडीट कार्ड किंवा UPI (Google pay/ Bhim/ Phone Pay /Paytm) / Bank Transfer ने भरता येईल
- केंद्राचे प्रमुख वैशिष्ट्ये -
• आता पर्यंत ची वाटचाल :
१. सकल मराठा समाजासाठी गेल्या चार वर्षापासून व्हाट्स अप ग्रुप च्या माध्यमातून विश्वसनीय कार्य.
२. व्हाट्सअप ग्रुप मध्ये आज पावेतो २५०० स्थळांची नोंदणी झाली आहे.
३. व्हाट्सअप ग्रुप मध्ये आजपावेतो ३०० लग्न सोयरीक जुळली आहेत.
४. व्हाट्सअप ग्रुप मध्ये आज पावेतो केंद्राच्या कार्याबद्दल चे ५०० आदरणीय सभासदांचे अभिप्राय व मनोगत प्राप्त झाले आहेत.
५. लॉकडाउनच्या काळामध्ये विनामूल्य ऑनलाईन सकल मराठा उपवर-वधूंचे ३ परिचय मेळावे संपन्न. प्रत्येक मेळाव्याला १०० उपवर वधुंची उपस्थिती.
• पुढील वाटचाल :
१. आजच्या युगात संगणक ही काळाची गरज, वाढती सभासद संख्या व सोप्या रीतीने सकल मराठा समाजातील वर- वधुची ची माहीती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वेबसाईटची निर्मीती करण्यात आली आहे.
२. वेबसाईट वर महाराष्ट्रातील सकल मराठा समाजातील उपवर वधु व पुनर्विवाहीत वर वधु यांची स्थळे उपलब्ध.
३. या वेबसाईट मध्ये सर्च ऑप्शन मधून वय , उंची , शिक्षण, नोकरी, उप-जात, व्यवसाय ठिकाण, मुळगाव इत्यादी पयार्य द्वारे योग्य स्थळ त्वरीत शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.
४. या वेबसाईट मध्ये नोंदणीकृत सदस्याला स्वतःचा फोटो बदलणे , पासवर्ड बदलणे , प्रोफाईल इडिट / अपडेट व प्रिंट करणे व पसंत असलेल्या स्थळां ना पसंती दर्शविणे इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.
५. आपण पसंती दर्शविलेल्या स्थळांची संपर्क माहिती आपल्याला ई-मेलद्वारे मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे , तसेच आपण पसंती दर्शविलेल्या स्थळांना आपला इंटरेस्ट ई-मेलद्वारे पाठविला जातो.
- नियम व अटी -
१. अर्ज स्विकृती -
या केंद्रांमध्ये फक्त सकल मराठा समाजातील उपवर-वधू व पुनर्विवाहित वर वधु यांचेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारल्या जातील.
२. वयाची अट -
नोंदणी अर्जासाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
३. नोंदणी अर्ज -
वेबसाईट वर आलेले सर्व नोंदणी अर्ज स्वतः उमेदवारांनी पाठविलेले आहेत. त्यातूनच आपल्याला योग्य उमेदवाराची निवड स्वतः करायची आहे. त्याची संपूर्ण चौकशी स्वतः करायची आहे. त्याला केंद्र जबाबदार राहणार नाही.
४. माहिती भरणे -
नोंदणी अर्जातील माहिती सत्य असावी. चुकीची माहिती भरल्यास त्याला आपण स्वतः जबाबदार राहणार.
५. फोटो अपलोड करणे -
उमेदवाराचे लग्न पाहणी करीता योग्य असलेले दोन फोटो – एक पासपोर्ट साईज फोटो व एक फुल साईज फोटो अपलोड करावे. फोटो सरळ असावा. (आडवा फोटो , सेल्फी फोटो , गॉगल लावलेला , फेटा बांधलेला , टोपी असलेलला फोटो अपलोड करु नये. फोटो मध्ये एकच व्यक्ती दिसणे आवश्यक आहे. इतर व्यक्ती ,वस्तु दिसता कामा नये.)
६. नोंदणी शुल्क -
आपण भरलेली नोंदणी शुल्क भरलेल्या तारखेपासून फक्त एका वर्षाकरीताच वैध राहिल. एका वर्षानंतर नूतनीकरण करणे आवश्यक आहे, अन्यथा आपले प्रोफाईल निष्क्रिय होईल. एकदा भरलेली नाव नोंदणी शुल्क / नुतनीकरण शुल्क कोणत्याही सबबी खाली परत मिळणार नाही.
७. स्थळांची पसंती दर्शविणे -
आपणास आपल्या अपेक्षेनुसार अनुरूप स्थळांना पसंती दर्शविता येईल. पसंती असलेल्या स्थळांची संपूर्ण चौकशी आपण स्वतः करावी. त्याला केंद्र जबाबदार राहणार नाही.
८. स्थळांची संपर्क माहिती मिळविणे -
आपणास एका आठवड्यात फक्त १० स्थळांची संपर्क माहिती घेता येईल. त्या स्थळांची संपर्क माहिती आपल्याला त्वरीत उपलब्ध होईल. संपर्क मिळालेल्या स्थळांची संपूर्ण चौकशी आपण स्वतः करावी. त्याला केंद्र जबाबदार राहणार नाही.
९. लग्न जुळल्या नंतर -
आपली सोयरीक जुळल्यानंतर आपण स्वतः आपले प्रोफाईल डिलिट करावे. तसेच प्रोफाईल डिलिट करताना साक्षगंधाचा फोटो किंवा शुभविवाह संपन्न झाल्या असल्यास त्याचा फोटो वेबसाईट मध्ये अपलोड करावा.
१०. हमी बाबत -
नाव नोंदणी नंतर आपली लग्न सोयरीक जुळेलच याची केंद्र हमी घेत नाही.
११. गैरवापरा बाबत -
वर-वधू च्या माहिती व फोटो चा कोणीही गैरवापर करू नये, तसे आढळल्यास त्याचे सभासदत्व रद्द करण्यात येईल.