श्री.माधवराव कदम
पुसद
वेरुळकर सरजी आपणास समाजभुषण पुरस्कार मिळाला. त्याचा आम्हाला खुप खूप आनंद झाला.आम्हाला तुमचा अभिमान वाटतो त्या बाबत आपले कौतूक करावे तेवढे कमीच.असेच समाजकार्य करण्या करीता खूप खूप शुभेच्छा ! व अभिनंदन ! आपणास आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभो हिच शिवचरणी व आई जगदंबे चरणी याचना करतो !
शुभेच्छुक -
श्री.माधवराव कदम
गांधी नगर, पुसद, जि.यवतमाळ
श्रीमती सुरेखा अशाेकराव पाटील
पुणे
वेरुळकर सर, नमस्कार !
खरचं आई वडिलांना खुप आनंद दिलाय !
ज्या मुला-मुलींची लग्न जुळवून दिली !
खरचं खूप सुंदर काम करताय !
शतक पूर्ण केल्याबद्दल मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन ! व मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक -
श्रीमती सुरेखा अशाेकराव पाटील
पुणे
श्री.लवकुमार पुरुषाेत्तम वेरुळकर
रा.येरळी ता. नांदुरा जि.बुलढाणा
माननीय....
श्री.षडानन वेरुळकर सर ..
आपण व्हॉटस ऍप ग्रुप द्वारे मराठा समाजाकरीता जे अमोल कार्य करत आहात. त्या बदल बोलावं तेवढं कमीच आहे. ही बाब अभिमानस्पद मलाच काय पण संपूर्ण येरळी गावाला अभिमानास्पद व कौतुकास्पद अशी आहे. तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्या..भावी जीवनात हिच सेवा अशीच सुरु राहोत हिच सदिच्छा.
शुभेच्छुक -
श्री.लवकुमार पुरुषाेत्तम वेरुळकर
रा.येरळी ता. नांदुरा जि.बुलढाणा
सौ.सुनिता किरण पाटील
अकोला
नमस्कार सर,
पहाता पहाता 100 लग्न जुळवलीत आपण. पैसे देवुनही ही कार्य होत नाहीत ते काम आपण निस्वार्थ पणे अविरत करत आहात.मार्गदर्शनही करता आस्थेने चौकशीही करता सर. खुप खुप अभिनंदन सर आपले .अशीच सेवा समाजाची आपल्या हातुन घडत राहो.
खुप शुभेच्छा सर.
शुभेच्छुक -
सौ.सुनिता किरण पाटील. तेल्हारा जि.अकोला
कु.रोशनी ह.पडोळे
अमरावती.
Congratulations sir
for 100 marriages,
सर आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आपण खूप काही करताय आपल्या समाजासाठी ते पण निशुल्क आजच्या काळात हे सर्व करणे म्हणजे समाज सेवाच आहे.फार कमी असे व्यक्तिमत्त्व बघायला मिळतात आजच्या काळात
शतक झाल्या बद्दल सर आपले मनापासून अभिनंदन ! व पुढील कार्यासाठी शुभेच्छा !
शुभेच्छुक -
कु.रोशनी ह.पडोळे
रा.वरुड जि.अमरावती.
वसंत भाकरे
अमरावती
वेरुळकर सर
प्रत्येक लग्न जुळविण्याचा क्षण आनंददायी असतो पण शतकीय लग्न जुळविण्याचा क्षणाचा आनंद काही वेगळाच असतो•तेही सामाजिक निस्पृह कार्याचे शतक त्याचा आनंद आगळा •त्याचे वर्णन शब्दाने व्यक्तकरणे शक्य नाही• तरीपण हा एक प्रयत्न •
आपल्या हातून प्रकुर्ती अशीच सतत सेवा घडु देत राहो हीच प्रार्थना•परत आपणास नि कार्यास शतश:प्रणाम
वसंत भाकरे अमरावती
महेश वानखेडे
उमरखेड़
मा. वेरुळकर सर.
अपण 100लग्न सोयरिक पार पाडले.... सोयरिक नुसती जुळ्वली नाही.तर किती कुटुंबांना एकत्र आणले आहे.हे फक्त आणि फक्त व्हाट्स अप च्या माध्यमातून.हे काही साधारण काम नाही.....हे एक खुप आनंदच म्हना की छंद.की अजुन काही.
पन खुप महान कार्य करत अहात सर..
आपणास यापुढेही असच यश मिळो .
महेश वानखेडे
विडुळ उमरखेड़
सौ संगीता व राजेंद्र रोकडे सर
पुसद
समाजभूषण पुरस्कार आदरणीय
श्री वेरुळकर सर आपण स्वतःला कुटुंबासह समाज कार्याला वाहून जे लग्न जोडण्याचे कठीण अमूल्य कार्य करून शंभर लोकांचा सुखाचा संसार सुरू केला आपल्या या कार्याला मानाचा सलाम !
शुभेच्छुक -
सौ संगीता व राजेंद्र रोकडे सर पुसद
शिवदास मानकर
Buldana
समाजभूषण,आदरणीय,माननीय हे सगळं म्हणण्या आधी तुम्हाला मित्राची उपमा द्यायला बरं वाटेल.आज तुमचं हे यश पाहून खरच खूप गर्व वाटतो की माझे मित्र षडानन वेरुळकर यांनी आजच्या तारखेपर्यंत 100 घरी आनंद पसरविला आहे आणि 100 नाती बनवली आहे.अर्थातच वेगवेगळ्या 200 कुटुंबांना कुठंतरी एकत्र केलं आहे.खरच आश्चर्याची गोष्ट आहे या whatsapp नी दोन एकदम अनोळखी परीवार एकत्र होऊ शकतात हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं, आणी या नेक कामामुळे अनेकांच्या नशिबाची बाग फुलली.
तुमची ही निस्वार्थ समाजसेवा पाहून असं वाटतं खरच तुम्ही ग्रेट आहात.तुमच्या या मोठ्या यशासाठी तुमचं खुप खुप अभिनंदन.
ईश्वरचरणी हीच प्रार्थना की तुमच्याही जीवणात खूप खूप आनंद येवो आणि तुमचं जीवन प्रफुल्लित होवो.
तुमचाच मित्र,
शिवदास मानकर (Hingana Balapur,Buldana)
पोहरे परिवार
सन्माननीय वेरुळकर सर
आपण आज लग्न जुळवण्याचे शतक पूर्ण केले त्याबद्दल आपले आमच्या पोहरे परिवाराकडून खूप खूप अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा, मला वाटते हा एक वर्ल्ड रेकॉर्ड असावा, आपले कार्या बद्दल कितीहि कौतुक करा ते कमीच पडेल, आपण कधी कधी तर फोन सुद्धा करून आमचे हाल हवाला विचारता, या धकाधकीच्या काळात एवढ कोणीच करत नसेल तेवढं आपण करता, आपल्या कार्याला आमच्या कडून शत शत प्रणाम.
धन्यवाद !