मनोगत

भाऊराव पाळेकर



अकोला



आदरणीय वेरुळकर सर , सप्रेम नमस्कार, आपल्या राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक महाराष्ट्र या व्हॉट्स अप ग्रुपच्या माध्यमातून आपण दिनांक १.१.२०१७ पासून अव्याहतपणे कार्य करून १५५ उपवर-वधू ची विवाह जुळणी केलेली आहे.खरंतर आपण आमच्यासाठी साक्षात ईश्वर स्वरुप देवदुत आहात.कारण अशा प्रकारचे महान कार्य करण्यासाठी ईश्वरी अंशच असावा लागतो आणि तो आपल्या कार्यातून भरभरून जाणवतो आहे. नुसतेच परिचय पत्र घेऊन ती ग्रुप वर पाठवून देणे यावर न थांबता आपण सदर कार्य हे अजून कसे भव्यदिव्य करता येईल अथवा सुनियोजित करता येईल यासाठी विविध उपक्रमाद्वारे नवनवीन योजनाअमलात आणून राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक महाराष्ट्र ही संस्था उच्चशिखरावर पोहोचून संपूर्ण महाराष्ट्रात त्याची ओळख निर्माण केली आहे व त्यासाठी सर्व समाज बांधवांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. .......आणि आता तर सर आपण दिनांक ३१.३.२०२० ला सेवानिवृत्त झाल्यापासून अतिशय महत्त्वाच्या दिशेने वाटचाल करून भरीव अशा कार्याची निर्मिती केलेली आहे आणि ते म्हणजे "ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा" ज्याद्वारे उपवर-वधू मुला मुलींकरता विनामूल्य ऑनलाइन परिचय मेळाव्याचे आयोजन. ज्याची या परिस्थितीत खूप आवश्यकता होती कारण सध्या काेरोनाजन्य परिस्थिती व लॉक डाऊन असल्यामुळे सर्व समाज बांधवांपुढे उपवर-वधू मुला-मुलींच्या विवाह जुळवणी चा यक्षप्रश्न उभा होता .आणि "घरीच रहा. सुरक्षित रहा"असे शासनाचे ब्रीदवाक्य असल्यामुळे कुठेही जाणे शक्य नव्हते. ......तेंव्हा अचानक आपण दिनांक २६.५.२०२० ला रात्री ९ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व ग्रुप सभासदांशी चर्चा करण्यासाठी मिटींगचे आयोजन केले.आणि पुन्हा दिनांक २७.५.२०२० ला सभा घेऊन उपवर-वधू मुल मुली सुद्धा सहभागी होऊ शकतात अशा सूचना दिल्यात आणि एवढ्यावरच न थांबता, ऑनलाईन वधुवर मुला मुलींचे नोंदणी अर्ज मागवून ऑनलाइन अर्जाची नोंदणी सुरू केली.अाणि पाहता पाहता १२५ उपवर-वधूंची अाॅनलाईन नाेंदणी झाली. ही खरोखरच आश्चर्य कारक बाब आहे. .....आणि अखेर दिनांक ३१.५.२०२० ला "विनामूल्य ऑनलाइन उपवर वधु परिचय मेळावा 2020" या नव्या उपक्रमाची सुरुवात केली. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून व इतर प्रदेशातून सुध्दा उपवर-वधूंनी स्वतःपरीचय दिला. एकूण १०० उपवर-वधू व त्यांचे अाई-वडीलासह कुटुंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्ट रित्या पार पडला. ही बाब सर्व समाज बांधवांसाठी अतिशय आनंदादाई असून मनाला दिलासा देणारी आहे.आणि अतिशय उत्कृष्टरित्या, उत्कृष्ट तंत्रासह आणि योग्य शिस्तबद्धता सह कार्यक्रमाचे नियोजन झाल्याबद्दल आपले अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा सर. तसेच सर. उपरोक्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातून प्रामुख्याने अजून एक विशेष गोष्ट अशी दिसून आली की, विनामूल्य अाॅनलाईन उपवर-वधू परीचय मेळाव्य मध्ये उपस्थित असलेल्या आदरणीय दोन ग्रुप सभासदांनी व त्यांचे इतर नातेवाईक यांनी कळविल्या मुळे त्यावर क्षणाचाही विलंब न करता फक्त त्यांचे कुटुंबातील इतर सदस्य व नातेवाईक यांचा गुगल मीट ऐप द्वारे विनामूल्य ऑनलाईन व्हिडिओ कान्फरान्स द्वारा प्रथम पाहणीचा कार्यक्रम लगेचच मंगळवार दिनांक २.६.२०२० रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करून सदर कार्यक्रमास दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्य व इतर सागे सोयरे आवर्जून उपस्थित होते. अाणि कार्यक्रम अतिशय यशस्वी रित्या संपन्न झाला आहे.हे या कार्यक्रमाचे भव्य दिव्य यश संपादन केल्याची फलश्रुतीच म्हणावी लागेल . याबद्दल मी वेरूळकर सर व त्यांचे कुटुंबीयांचे मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. असे हे आपले भव्य दिव्य कार्य नवनवीन योजनेसह अजून प्रगती पथावर जावो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि ईश्र्वर आपणास शक्ती प्रदान करो. तसेच आपण व आपले कुटुंबाचे आरोग्य सदोदित सुदृढ राहो.अशी ईश्र्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.

साै. माया प्रकाश ढाेरे श्री. प्रकाश भिमराव ढोरे



काळा मारोती रोड, जुने शहर अकोला.



आदरणीय श्री.वेरुळकर,सर नमस्कार ! •••••••••••••••••••••••••••••••••• कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका , आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास ते काम सोडूच नका. जर आपला हेतुच शुध्द आणि प्रामाणिक असेल तर... आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते. चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात. ••••••••••••••••••••••••••••••••••

री.शिवहरी अवधूत टाले साै.अलका शिवहरी टाले.



न्यू खेतान नगर, कौलखेड, अकोला.



नमस्कार ! वेरुळकर सर आजच्या या व्यस्त काळा मध्ये आपण आपला अमुल्य असा वेळ देऊन हे सामाजिक कार्य करीत आहात ते अभिनंदनास्पद आहे आणि अाॅनलाईन मेळावा घेउन आपण लोकांच्या मनात अधीक आदराचे स्थान निर्माण केले आहे. धन्यवाद !

गजानन काटे, अकोला





आदरणीय समाजदूत सन्माननीय श्री.वेरुळकर सर, काळाची गरज ओळखुन आपण डिजिटल वधुवर परिचय मेळाव्याचे lock down च्या काळात दि. ३१ मे २०२० रविवार रोजी उत्कृष्ट आयोजन केले त्याबद्दल आपले व आपल्या कुटुंबियांचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा. उपस्थितांनी परिचय करून दिल्या नंतर उपवर-वधुंनी जोडीदार निवडताना कुठली दक्षता घेतली पाहिजे त्याच बरोबर कुठल्या कसोटीवर किती जोर द्यावा ह्याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. आपण दोन सत्रा मधे हा मेळावा ठेवला होता व सर्वांनी सह कुटुंब पुर्ण वेळ उपस्थिती देण्याला कारण म्हणजे आपलं ओघवत सुत्र संचलन, मधुन मधुन मिश्किल भाषा, प्रत्येकाशी सुसंवाद व समस्याचे निराकरण. एकंदरीत डिजिटल वधुवर परिचय मेळावा सुसत्रबद्धरीत्या संपन्न झाला. धन्यवाद !

Sachinrao Shriramrao Bhatkar(Suryavanshi)



Proper : Golegaon Tq:Shegaon District :Buldana (Working Teacher at Z.P. Washim)



I am proud to be member of group ,,,the arrangement of marriage engagement on digital platform in such critical time is very praisable work. the intellectual linkages and group connectivity achieving day by day is very helpful in future for enstablishment of farmer agro companies and future marketing alliances .........the great and fundamental works you are doing for society ....congratulation sir

श्री मधुकर रामभाऊ शिंदे



पुसद जिल्हा यवतमाळ



वेरुळकर सर, आजच्या काळात आपल्या या उपक्रमामुळे पालकांना सुयोग्य मध्यस्थ मिळाला असून,कोरोनाच्या या संकट काळात घराबाहेर न जाता चांगले स्थळे घरी राहून बघता येत आहेत,हे आमच्या सारख्या पालकांचे भाग्य आहे. आपल्या या निस्वार्थ कार्याबद्दल कोटी कोटी प्रणाम.. धन्यवाद..

एम.आर.सित्रे सर



हायटेक सिटी, तेलंगाना



आदरणीय श्री~ वेरूळकर स.न. तुमचं कार्य अगदी योग्यदिशेने सुरु आहे. मराठा समाजातील मुला मुलींच भविष्य तुमच्या माध्यमातून उत्तम घडते आहे. तुमच्या या अतिउत्तम कार्याला माझ्या शुभेच्छा. एम.आर.सित्रे सर हायटेक सिटी, तेलंगाना ( हैद्राबाद ) 500049.

अभय ठाकरे (शिक्षक)



नागपूर



अभय ठाकरे (शिक्षक) नागपूर नमस्कार ! माननीय श्री.षडानन वेरुळकर सर खरच तुम्ही राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक हा ग्रुप कुणबी समाजातील वर - वधू साठी स्थापन करुन दिनांक 16/06/2019 ला माझ्या छोटा भाऊ स्वप्निल ठाकरे शिक्षण एमबीए TCS कार्यरत याच्या लग्न जोडण्याकरिता आपल्या मार्फत मिळणारे मार्गदर्शन तसेच ग्रुपच्या माध्यमातून खूप खूप मदत झाली.सर खरोखरच आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात जो तोआपा-आपल्या पुरता मर्यादीत होत आहे कुणीही मध्यस्ती च्या भानगडीत पडायला तयार नाही त्यामूळे लग्न जुळणे व वर-वधू शोधणे फार कठीण होऊन बसले आहे परंतू तुमच्या या उपक्रमामुळे त्याला संजीवनी मिळाली सर तुम्ही आपला अमुल्य वेळ या कामी खर्च करुन समजा मधे एक आदर्श निर्माण केला ह्या बद्दल संपूर्ण कुणबी समाज आपला ऋणी आहे. धन्यवाद ! शुभेच्छुक - अभय ठाकरे (शिक्षक) नागपूर

विनायकराव बळवंतराव बकाल



बुलढाणा



मा. षडानन वेरूळकर सर, कळविण्यात आनंद होतो की, आपल्या राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक , महाराष्ट्र या गृप च्या माध्यमातून माझ्या मुलाचे •••••••••••••••••••••••••••••••••• चि.गौरव ‌ श्री विनायकराव बळवंतराव बकाल रा .वरवट बकाल जि. बुलढाणा आणि चि.सौ.कां.मृण्मयी श्री.अरूणराव पांडुरंगजी चांदुरकर रा.दर्यापूर जि.अमरावती, यांची लग्न सोयरीक जूळली असुन साक्षगंध कार्यक्रम दि १८/६/२०१९ ला संपन्न झाला आहे. सदरचे सामाजिक कार्य आपल्या कडून असेच सुरू राहो ही सद्गुरू चरणीं प्रार्थना ! सहकार्या बद्दल धन्यवाद ! आपला स्नेही. विनायकराव बळवंतराव बकाल, शेगांव जि. बुलढाणा

सौ.उषा व श्री भाऊराव पाळेकर



अकोला



आदरणीय वेरुळकर सर, आज मुला/मुलीच्या लग्नासाठी अनुरुप असलेली स्थळं शोधणे ही अतिशय पराकाष्टे ची गोष्ट झालेली आहे.पूर्वीच्या काळी आपल्या वाड-वडिलांना पायपीट करून विवाह जुळवावे लागत असत. हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आज आपण आपल्या समाजाप्रती जाणीव ठेवून खूप महत्वाचे आणि अनमोल असे कार्य हाती घेतले आहे आणि तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता सतत कार्यमग्न राहून अनमोल अशा कार्याची धुरा सांभाळत आज पर्यंत आपल्या ग्रुप मार्फत ११४ मंगल कार्य जुळली आहेत ही बाब खरोखरच अभिनंदनीय आहे ! हे आपले कार्य असेच कायम राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! पुन्हा एकदा आपणास मनापासून अभिवादन.. सौ.उषा व श्री भाऊराव पाळेकर अकोला.

Page 9 of 15