डॉ.दिनकरराव शेषराव माहाेरे
अकोला
आदरणीय श्री वेरुळकर सर
केवळ आपल्या राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक, महाराष्ट्र या ग्रुप मुळे माझ्या मुलाचा लग्नाचा योग दि.१३/८/ २०२० ला आला. अगदी आमच्या चॉईस प्रमाणे पाहिजे तशी उंच, गोरी ,M.sc.(Math), B.Ed मुलगी मिळाली, मी माझ्या Criteria प्रमाणे ६,७ स्थळांशी संपर्क साधला , त्या पैकी श्री.वासुदेवराव मोरे, टाकरखेडा (मोरे) यांची मुलगी कु.वैशीली, M.sc.(Math), B.Ed व माझा मुलगा चि.सौरभ B.E.(Computer) यांचा योग आला. लग्न Covid 19 च्या नियमानुसार साधे पध्दशीरपणे पार पडले .आपल्या ग्रुप मध्ये चॉइस भरपुर आहे, त्यात तडजोड कशी करावी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आपण प्रकृती चांगली नसतांना जिद्दीने व चिकाटीने हे सामाजिक कार्य करता याची प्रशंशा करावी तेवढी कमीच आहे. माझे कडे आपले आभार व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतात .केवळ आभार मानून आपल्या ऋणातून मुक्त होण्यापेक्षा मी आपल्या ऋणात सदैव कायम राहु इच्छितो.आपणास दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना !
••••••••••••••••••••••••••••••••••
डॉ.दिनकरराव शेषराव माहाेरे
अादर्श काॅलनी, अकोला
साै.सुधाताई मनाेहर गावंडे
अकाेला
श्री.वेरुळकर सर, नमस्कार !
या दोन दिवसात ग्रुप वर दोन लग्न झालेले वधू-वर जोडपी पाहून आनंद वाटला. सरांच्या मेहनतीचे चीज झाले. आता तब्येत बरी नसते. पण यश मात्र भरभरून प्रतिसाद देत आहे. असच यश आपल्याला मिळत राहो. त्याच प्रमाणे अापली प्रकृती लवकर ठिक हाेवाे.
ही प्रभू चरणी प्रार्थना !
सरांनी समाज सेवेतील अतिशय अवघड विषय सेवेला घेतला आहे. आणि त्यात ते पारंगत श्रेणीत पास होत अाहेत. या सेवेमध्ये अतिशय मेहनत आहे त्यामुळे सरांना त्रास होतो. पण घेतलेला वसा ते साेडणार नाहीत. गाडी, बंगला यांनी जे समाधान मिळत नाही ते या सेवे मुळे मिळते. तेव्हा सर ही सेवा सुरुच ठेवणार अाहेत. परंतु सर त्रास कमी करण्यासाठी उपाय आहे तो म्हणजे वेबसाईट सुरु करणे त्यामुळे सरां प्रमाणेच ग्रुप वरील सर्वांना काम सोपे होईल. व कमी वेळात व्यवस्थीत परिचय पत्र पाहाता येतील. परत सरांना या शुभ कामासाठी शुभेच्छा ! धन्यवाद !
••••••••••••••••••••••••••••••••••
साै.सुधाताई मनाेहर गावंडे
रा.दहिगांव गावंडे ता.जि.अकाेला.
ह.मु.विजय हाऊसिंग काॅलनी, गाेरक्षण राेड, अकाेला.
प्रा.श्रीधर बाठे
आदरणीय मामासाहेब
शिरसाष्टांग नमस्कार !
आपली प्रकृती ठीक हाेत नाही ताे पर्यंत संगणक व माेबाईल वर काेणत्याच प्रकारे काम करु नये.
वेबसाइट चे काम बाहेरुन करून घ्यावे व पुढे वेबसाइट व्दारेच ग्रुपचे कार्य करावे. ग्रुपची संख्या वाढत असल्यामुळे ग्रुपचे कार्य व्हाॅटसअप व्दारे करणे शक्य नाही. शिवाय वेबसाइट ही एक सर्विस अाहे. ग्रुपचे कार्य वेबसाइट व्दारे करणे ही सुद्धा एक सेवाच आहे. प्रकृती कडे लक्ष असणे आवश्यक आहे. काळजी घ्या व लवकर बरे व्हा ही नम्र विनंती अाहे.
••••••••••••••••••••••••••••••••••
प्रा.श्रीधर बाठे, नांदुरा जि.बुलढाणा
सुरेश पुंडलिकराव ठाकरे
श्री.वेरुळकर सर ,
नमस्कार !
श्री.भाऊराव पाळेकर साहेब यांनी जे मत मांडले. त्यास माझा पुर्ण पाठिंबा आहे, तर वेरुळकर सर, खरच वेबसाईट सुरू करावी ही विनंती आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••
सुरेश पुंडलिकराव ठाकरे
द्वारा डॉ.पी.टी.ठाकरे, परमहंस निकेतन, छोटी उमरी, अकोला. 444005.
भाऊराव पाळेकर, अकोला
आदरणीय वेरुळकर सर
सप्रेम नमस्कार
सर आपण वेबसाईट सुरु करावी म्हणून बऱ्याच सभासदांकडून त्यांच्या मनोगता द्वारे होकाराची भावना स्पष्ट होत आहे. कुणी आपल्याशी वैयक्तिक दूरध्वनीद्वारे बोलून तर कोणी लिखित स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करीत आहेत सर्वच सभासदांना तुम्ही हवे आहात. हीच तर खरी आपल्या सामाजिक कार्याची खरी ओळख आहे.
लॉक डाऊन च्या काळात आजतागायत आपले प्रत्येक कार्य आपण जिद्दीने, कष्टाने आणि मेहनतीने पूर्ण केले आहे. यातील नेत्रदीपक अशी भरीव कामगिरी सर्व समाज बांधवांच्या चांगली लक्षात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देश विदेशात सुद्धा आपल्या कार्याचे कौतुक होत आहे.
हे सर्व कशामुळे होत आहे. तर.. हे सर्व आपल्या स्वभावातील आंतरिक गुणांमुळे व प्रभावी विचारांमुळे शक्य होत आहे.
ज्यांनी कुणी आपले मनोगत व्यक्त केले आहे त्या सर्वांनी आपल्या कार्याचे भरभरून कौतुक केले आहे.
........कुणी ईश्वरी स्वरूप, कुणी देवदूत तर कुणी अवतारी पुरुष, तर कुणी थोर पुरुष
.........तर कुणी युग पुरुष म्हणून आपली गणना केली आहे. नव्हे, एक प्रकारची मानाची उपाधी आपणास प्रदान केली आहे.
.........कुणी शांत, धीरगंभीर, सहनशील, आणि सेवाभावी वृत्ती अशा सर्व गुणांनी आपण परिपूर्ण आहात अशा स्वरूपाचे मनोगत व्यक्त केले आहे.
..........तर कुणी आपल्या कार्यासाठी आपल्या मध्ये असलेली जिद्द, चिकाटी, वेळ, कष्ट, मेहनत, परिश्रम, अविश्रांत काम, सहिष्णुता, निस्वार्थ सेवा, या सर्व गुणांचे भरभरून कौतुक केले आहे.
.........तर काहींनी आपल्या सामाजिक कार्याची मशाल अखंड चेतवत ठेवणे ही खरोखरच अवघड स्वरूपाची बाब असल्याचा आशय त्यांनी व्यक्त केला आहे.
आदरणीय सभासद
मुख्याध्यापक, श्री.हेमंत चाेपडे, नाशिक,
प्राचार्य, श्री.माेहन पाटील, पुणे,
प्राचार्य, डॉ.सुरेश बाठे, बुलढाणा,
श्री. दिलीप पाटील, अमरावती,
श्री. रमेश पाटील सर, पुणे,
श्री. सुरेश राेंघे, नागपूर,
साै. नंदिनी जवादे, हिंगणघाट,
यांनी सर्वांनी अतिशय सुंदर मनोगत दिले आहे. त्यामध्ये त्यांनी "आपल्या कामाचा व्याप हलका करण्यासाठी लवकरात लवकर वेबसाईट सुरू करावी" अशी आग्रही भूमिका त्यांनी दर्शवली आहे.
अजूनही बऱ्याच आदरणीय सभासदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यामधील काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे देत आहे.
१) वेरुळकर सरांनी आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे. असे आवर्जून कथित केले आहे.
२) सरांनी परिचय मेळाव्याचे सफल आयोजन करून एक नवीन क्रांती घडवून आणली आहे.
३) आपण आपले सर्वस्व पणाला लावून आज ही संस्था अतिशय प्रभावीपणे आणि खंबीरपणे उभी केली आहे.
४) आपले कार्य खूप बहुमोलाचे आहे..
५) वेरुळकर सर हा उपक्रम पदरमोड करून निःस्वार्थ सेवाभावी निःशुल्क अविरत करीत आहे. हा यज्ञ असाच अखंडित प्रज्वलित राहो ही सदिच्छा व्यक्त केली आहे.
६) परमेश्वर तुमच्या सोबत आहे सर्व लोकांच्या सदिच्छा पण आपल्या सोबत आहेत.
७) आपले प्रकृतीस्वास्थ बरोबर नसतांना सुद्धा दोन जीवांचे मनोमिलन घडवून आणण्याचे कार्य अतुलनीय असून त्या सेवेला तोड नाही. आपल्या या समाज सेवेला आमचा मानाचा मुजरा.
८) कोविड १९ या महामारीच्या
संकटात सुद्धा आपण आपले कार्य न थांबविता ऑनलाईन सुरू ठेवले कामात खंड पडू न देणे हा आपला स्वभाव गुण आहे.
एकंदरीत राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरीक पुसद जिल्हा यवतमाळ ह्या व्हॉटस् अप ग्रुप मधील सभासदांनी वरील प्रमाणे जी आपली मनोगते कथित केले आहे. त्यामध्ये सर्व सभासदांनी प्रथम आपल्या आरोग्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे. कारण "आरोग्य चांगले तर सर्व काही चांगले" असे आग्रही भावनेने आपल्याला सूचित केले आहे.
...आणि त्यानंतर आपण कमीत कमी वेळात, कमी त्रासा वीणा जास्तीत जास्त काम कसे करता येईल ? याचा विचार करून त्यादृष्टीने "वेबसाईट" ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी. असे मनोगत व्यक्त केले आहे.
ईश्र्वर आपणास व आपले कुटुंबीयास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करो ही प्रभु चरणी प्रार्थना करतो.
धन्यवाद.
भाऊराव पाळेकर, अकोला
कु. पूजा गुजर
यवतमाळ
अादरणीय श्री.वेरुळकर ,सर
सप्रेम नमस्कार !
अादरणीय साै. वनमाला आवारे, मॅडम यांनी अतिशय सुंदर प्रकारे तुमच्या नावाचा खरा आणि अचूक असा अर्थ मॅडम नी सांगितला.
मॅडम अापले खुप अभिनंदन व धन्यवाद !
सर तुमचे कार्य खूप छान आहे आणि आपल्या समाजासाठी विनामूल्य एवढं छान कार्य तुम्ही करत आहात. ते सुद्धा Digital माध्यमातून .
मॅडम नी खूप सुंदर शब्दात तुमचे आभार मानले आहेत. तुमच्या नावाचा अर्थ तुमचं अमूल्य कार्य आम्हाला सांगत आहे.
तुम्ही आमच्या साठी Inspiration आहात.
आजकाल च्या Busy Schedule मध्ये तुम्ही वैयक्तिक वेळ काढून तो वेळ तुम्ही या कार्या साठी खर्ची घालत आहात, हे ही तितकेच कौतुकास्पद आहे.
Thank you खूप कमी आहे तुमच्या या कामासाठी, तरी पण Thank you sir आमच्या Good wishes नेहमी तुमच्या सोबत आहे.
भाऊराव पाळेकर
अकोला
आदरणीय वेरुळकर सर
सप्रेम नमस्कार
लॉक डाऊन च्या काळात राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरिक पुसद जिल्हा यवतमाळ, या व्हॉटस् अप ग्रुप द्वारा तीन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. त्यापैकी पहिला मेळावा दिनांक ३१ मे २०२० दुसरा मेळावा दिनांक १४ जून २०२० आणि तिसरा मेळावा नुकताच १९ जुलै २०२० ला आयोजित केला गेला होता. तीन ही मेळाव्या करिता १०० पेक्षा जास्त उपवर वधू मुलामुलींनी सहभाग घेतला होता त्यांचे पालक वर्ग सुद्धा आवर्जून उपस्थित होते. दिनांक १९ जुलै २०२० रोजी आयोजित केलेलाऑनलाईन तिसरा मेळावा हा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आहे आपले प्रकृती स्वास्थ्य ठीक नसून सुद्धा सकाळी ११.४५ पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अखंड एकाच ठिकाणी बसून अगदी खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाचे उत्तमरित्या सादरीकरण केले. कुठेही कंटाळवाणे पणा दिसून आलेला नाही ही बाब खरोखरच सर आपल्या करिता अभिमानास्पद आहे.
तसेच आपल्या बोलण्यातील गोडवा हा कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत एकसारखा कायम होता त्यामध्ये कुठेही कटुता आढळून आलेली नव्हती अगदी धीरगंभीर, सावकाश, निवांत आणि शांतपणे कार्यक्रमाची लय - बद्धता सुरू होती. त्यामध्ये आवाजाचा कुठेही चढ-उतार पणा दिसून आलेला नाही. कार्यक्रमातील प्रत्येक उपस्थित उपवर-वधू मुला-मुलींच्या परिचय पत्रातील काही काही बाबी आपण स्वतः त्यांना विचारून त्यांना बोलते करून पूर्ण करून घेत होते यावरून कार्यक्रम हा उत्कृष्ट व्हावा, आणि उपस्थित पालक वर्गाला प्रत्येक उमेदवाराची परिपूर्ण माहिती मिळावी, तसेच क्रमांकानुसार प्रत्येक उपवर-वधू उमेदवार परिचयासाठी उपस्थित न झाल्यास ते उपस्थित व्हावे म्हणून वारंवार त्यांच्या नावाची घोषणा करित होते. यावरून उमेद्वारा विषयी आपल्याला असलेली आपुलकी,प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, जीवाची तगमग, तळमळ अतिशय तीव्र स्वरूपात असल्याचे जाणवत होते.
म्हणतात ना ! सर ,"ज्यांचा स्वतःवर व स्वतःच्याअभ्यासावर प्रचंड विश्वास असतो ते जीवनात कधीच हार मानत नाही"
१६७ विवाह जुळवणी चे ध्येयपूर्ती करता आपल्याला अनेक अडचणींशी सामना करावा लागला, अनेक कठीण प्रसंग उद्भवले, पण यामध्ये कधीही आपण माघार घेतली नाही सतत पुढे पुढे आणि पुढेच जात राहिलेत. त्या मुळेच तर आपली राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरीक पुसद जिल्हा यवतमाळ ही संस्था राज्यात व देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा नावारूपास आली आहे. त्याबद्दल आपले व आपल्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा.
तसेच कार्यक्रमाची तांत्रिक बाजू ज्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली ते म्हणजे आपले सुपुत्र श्री.वैभव कुमार वेरुळकर यांचे सुद्धा खुप खुप अभिनंदन.
ईश्वर आपणास व आपल्या कुटुंबियास सुदृढ आरोग्य प्रदान करो व आपली संस्था ही नवनवीन योजनेसह प्रगतीपथावर जात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
भाऊराव पाळेकर
अकोला
प्रा. महादेवराव शंकरराव कोठेकर साै.शैलजा महादेवराव काेठेकर
प्राध्यापक काॅलनी,दर्डा नगर,यवतमाळ
"अप्रतिम" "सर्वोत्कृष्ट" ह्या शब्दांमध्ये आपल्या दि.19 जुलैच्या कार्यक्रमाचे वर्णन केल्यास शब्द अपुरे ठरतील. त्याबद्धल सर्व प्रथम आपले व आपल्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. आपल्या प्रकृतीकडे पूर्णपणे डोळेझाक करून आपण उपरोक्त ऑनलाईन परिचय मेळावा यशस्वी केला त्या आपल्या कार्य तत्परतेस तोड नाही. आपण व्हाट्सअँप द्वारे कोरोना सारख्या महामारीच्या बिकट परिस्थितीतही जी कर्तव्य परायनता व धडाडी दर्शवून सामाजिक कार्य पूर्णत्वास नेत आहात त्यामुळे मी व माझे कुटुंब आश्चर्याने थक्क झालो आहे. आपण सामाजिक बांधिलकी पोटी प्रतिकूल परिस्थितीत निस्पृहतेने फळाची अपेक्षा न बाळगता जे निष्काम कर्म करीत आहात त्या आपल्या लढवय्या प्रवृत्तीस माझा सलाम. आपल्या सामाजिक कार्यामुळे येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळून त्यांच्या पुढे सामाजिक कार्याबद्धल सकारात्मक आदर्श उभा राहील. आपल्या सकारात्मक कार्यामुळे आपण मला "प्रचंड वादळात संयमी व धीरगंभीरतेने उभ्या असलेल्या वटवृक्षा प्रमाणे भासता". आपणास उपरोक्त सामाजिक कार्य सातत्याने सुरू ठेवण्या करीता उत्तम आर्यु-आरोग्य व निरामय जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व सदिच्छा.
आपले स्नेही व हितचिंतक.
प्रा. महादेवराव शंकरराव कोठेकर
साै.शैलजा महादेवराव काेठेकर
प्राध्यापक काॅलनी,दर्डा नगर,यवतमाळ
भाऊराव पाळेकर,अकोला
आदरणीय वेरुळकर सर
सप्रेम नमस्कार
सर्व प्रथम सर आपले अभिनंदन. कारण गट संचालक, राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक महाराष्ट्र .पुसद जि.यवतमाळ या आपल्या व्हॉटसअॅप ग्रुप मार्फत दि. १ जानेवारी २०१७ पासून ते दि. ३० जून २०२० पर्यंतच्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत- १६२ उपवर-वधू मुला-मुलींचे विवाह जुळवणी चे कार्य अापण अतिशय उत्तम रित्या पार पाडले आहे. या बद्दल आपले व आपल्या कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन. आणि खूप खूप धन्यवाद.
या ध्येय्या पर्यंत पोहोचण्यासाठी सरांनी केलेली अहोरात्र मेहनत अगदी अंत:करणापासून केलेली धडपड, जिद्द, चिकाटी, जिज्ञासू वृत्ती आणि बोलण्यातील माधुर्य तसेच योग्य निर्णय क्षमता, स्वतःच्या कार्याबद्दलची आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संयमशील वृत्ती, सहनशीलता आणि सोशिकपणा या सर्व गुणांच्या माध्यमातून सरांनी आपल्या राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक महाराष्ट्र. पुसद जि.यवतमाळ या व्हॉटसअॅप ग्रुप ला संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर इतर प्रदेशामध्ये सुद्धा अत्युच्च शिखरावर पोहचवून प्रसिद्धी मिळवली आहे. सरांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या भव्य दिव्य यश प्राप्तीमुळे त्यांना " मराठा समाज भूषण गौरव पुरस्कार " प्रदान करून यशाचे मानकरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ही बाब आपल्या सर्व समाज बांधवांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. खरोखरच सरांच्या या कार्याला सर्व समाज बांधवांकडून शतश: प्रणाम !
सरांचे हे भव्य दिव्य कार्य पाहून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. कदाचित आपल्याही मनात हाच प्रश्न निर्माण झाला असेल तो म्हणजे सरांनी याच समाजकार्याची कशी काय निवड केली ? या कार्याबद्दल सरांना प्रेरणा कुठून मिळाली ? आणि हेच कार्य सरांना का करावे वाटले ? या उत्सुकते पोटी प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी प्रत्यक्षात भ्रमणध्वनी वर सरांशी संपर्क साधला.
यावर आदरणीय सरांनी दिलेले उत्तर खूप प्रेरणादायी आहे. ते म्हणाले," माझ्या लहानपणी, म्हणजे असेल तो चाळीस वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हाच्या काळात विवाह जुळवणी संदर्भात माझ्या वडिलांचे मदत कार्य मी प्रत्यक्ष पाहत होतो. माझे वडील पेशाने शिक्षक होते. माझे वडील बाहेर गांवी नाेकरीच्याच गांवी राहायचे .माझ्या वडिलांना गांव परिसरातील व आजूबाजूच्या गावातील आपल्या समाजातील लोकांच्या नातेवाईकांची खूप माहिती होती. माझे वडीलांची स्मरण शक्ती खूप दांडगी होती. त्यांचा बाेलण्याचा अावाज माेठा हाेता. अावाजा वरुन ते लाेकांना न दिसताच कळायचे की, वेरुळकर गुरुजी येत अाहेत. शिवाय माझे वडील खूप बाेलके हाेते ते प्रत्येक माणसाशी स्वत:हुन बाेलायचे. अाणि लाेकांना सुध्दा त्यांचे बाेलणे खूप अावडायचे त्या मुळे खूप लोकांशी त्यांचा संपर्क होता. आणि गावातील लोकसुद्धा आपुलकीने विवाह जुळवणी संदर्भात माझ्या वडिलांकडे येत होते आणि वडील सुद्धा त्यांना स्वतःचे कार्य समजून मदत करीत असत. वेळ प्रसंगी त्यांचे सोबत जात असत. त्या वेळी सर्व गावा पर्यंत जाण्यासाठी बस सेवा सुद्धा उपलब्ध नव्हती त्यामुळे कधी पायी प्रवास तर कधी बैलगाडी ने प्रवास करून संबंधितांशी संपर्क साधून दोन्ही कुटुंबातील लोकांना समजावून सांगून विवाह जुळवणीचे कार्य करण्यात मदत करीत होते. तसेच गावातील लोकांच्या कुठल्याही कार्यप्रसंगी ते आवर्जून उपस्थित राहत असत. माझ्या वडिलांच्या बाेलक्या स्वभावामुळे अाणि होतकरू, कष्टाळू, निस्वार्थी, धार्मिक, प्रामाणिक वृत्ती मुळे गावातील व परगावातील बहुतेक सर्व लोकांना माझ्या वडिलांची चांगलीच ओळख होती. बरेच विवाह कार्य जुळण्यास त्यांची मदत झाली.
........शेवटी वयोमानामुळे आणि प्रकृतीस्वास्थ्य बरोबर राहत नसल्यामुळे एक दिवस वडिलांनी मला जवळ बोलावून सांगितले कि, " षडानन तु सुध्दा समाजातील सर्व नातेवाईकांची माहिती लक्षात ठेव ही सर्व माहिती पुढे कामात येत असते. मुला-मुलींचे विवाह जुळवणी संदर्भात सोयरीक संबंधाचे कार्यास मदत करीत राहा आणि जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून समाजातील सर्व संबंधित लोकांच्या नातेवाईकांशी ओळख ठेवून माहिती संग्रहित करून ठेव. आणि चांगली प्रगती करून नावारूपास ये ! हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. व ते साकार करण्यासाठी मी समाजातील लोकांशी व त्यांच्या इतर नातेवाई कांशी संपर्क साधून वेळोवेळी उपवर वधू मुलामुलींच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून विवाह जुळवणी च्या कार्याची माहिती जाणून घेत होतो. कुठल्याही कार्यप्रसंगी तेथील नवनवीन लोकांशी ओळख करून घेत होतो. अशा रीतीने विवाह विषयक जुळवणी संबंधातील कार्याची परिपूर्ण माहिती झाल्यानंतर तसेच एक आनुवंशिकता म्हणून वडीलांमध्ये असलेले गुण कदाचित माझ्या मध्ये उपजतच असावे. असे मला वाटून मला एक मोठा आत्मविश्वास निर्माण झाला की, मी हे समाज कार्य करू शकतो. आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर तसेच मला वडिलांनी केलेल्या उपदेशानुसार त्यांचे स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्या दिशेने पावले उचलण्यास सरुवात केली. आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून बऱ्याच अनुभवा अंती अखेर दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक महाराष्ट्र. पुसद जि.यवतमाळ हा व्हॉटसअॅप ग्रुप उदयास आला. अशा प्रकारे मला माझ्या वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणादायी उपदेशाने या समाजकार्याची आवड निर्माण झाली. अाणि त्यातूनच माझ्या मध्ये हा छंद निर्माण झाला. ताेच छंद मी अाज जाेपासताे अाहे.
दि. १/१/२०१७ पासून अाज पावेतो सरांनी घरगुती, कौटुंबिक व नोकरी विषयक सर्व जबाबदाऱ्या सांभाळून वडिलांप्रमाणेच बाहेर गांवी राहून हे समाजकार्य अव्याहत पणे सुरू ठेवले आहे आणि साडेतीन वर्षाच्या या कालावधीत नव नवीन तथा वेगवेगळ्या उपक्रमांची निर्मिती करून सर्व समाजबांधव तथा सभासदांच्या सहकार्याने विशेष म्हणजे कुठल्याही शुल्काची अपेक्षा न ठेवता नि:शुल्क व निस्वार्थ सेवा करण्याचे कार्य अखंड सुरू ठेवले आहे. याबद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन ! आणि खूप खूप धन्यवाद ! ईश्वर त्यांना अधिकाधिक शक्ति देवो आणि त्यांना व त्यांचे कुटुंबीयास उत्तम आरोग्य प्रदान करो हि प्रभू चरणी प्रार्थना करतो !
तेव्हा, राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक महाराष्ट्र या ग्रुपमधील सर्व सभासदांना माझी अशी विनंती आहे की सरांनी आतापर्यंत ज्या काही नवीन योजना सुरू केलेल्या आहेत त्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाल्या आहेत. आता सरांनी एक नवीन उपक्रम सुरू केला असून त्यासाठी आपण सर्वांनी सरांच्या अपेक्षेप्रमाणे जास्तीत जास्त उपवर वधू मुलामुलींचे परिचय व्हिडिओ तयार करून, तयार केलेला व्हिडिओ व साेबत परिचय पत्र सरांना पाठवावे आणि सरांच्या या अतिशय सुंदर अशा नवीन उपक्रमाच्या प्रगतीपथा साठी उपवर-वधू मुला-मुलींच्या पालकांनी जास्तीत जास्त संख्येने पुढे यावे, जेणे करून आपणास सोयरिक संबधा बाबतची अपडेट माहिती त्वरित प्राप्त होण्यास बहुमोलाची ची मदत होईल. आणि अापण कुठल्याही कष्टाविना घरी बसल्या बसल्याच योग्य उपवर-वधु मुला-मुलींचे विवाह जुळवणी विषयक कार्य अगदी तत्परतेने करू शकू.
धन्यवाद सर.
भाऊराव पाळेकर
गोपाल एकनाथ ठाकरे (पाटील) साै.संजिवनी गोपाल ठाकरे (पाटील)
भोजला, ह.मु ." शिवछत्र" निवास पुसद ता.पुसद जि.यवतमाळ
आदरणीय वेरुळकर सर
नमस्कार !
"आधुनिक युगातील भगिरथ"
आमचे सर म्हणजे आधुनिक भगिरथ च आहेत, तब्येत बरी नसतांना सुद्धा समाजासाठी एवढा वेळ देणारा मनुष्य, या काळात दुर्मिळच, डोळ्याचे ऑपरेशन होऊन सुद्धा ते पूर्ण वेळ कॉम्पुटर / माेबाइल वर असतात, आजकाल रस्यावर घराचा पत्ता विचारलं तर कोणी सांगत नाही, पण सर मात्र निसवार्थी भावनेने समाजाची अखंड सेवा करत असतात,
अाम्हाला वाटत कि, अशी बहुमूल्य माणसं आपण जपली पाहिजेत, करितां
सरांनी आता वेबसाईट चालू करावी, त्यामुळे सर्वांना भरपूर स्थळे पाहता येतील, अाणि भरपूर सभासद हाेतील. त्याकरिता येणारा नाममात्र खर्च आपण सर्वानी देऊन त्यांना प्रोसाहित केले पाहिजे, असे अाम्ही आवाहन करतो की, ग्रुपवरील पालकांनी या गोष्टीचा आग्रह सरांना धरला पाहिजे, कारण समाजाचा त्यामुळे फायदा होईल,
अाम्ही तर सरांना खूपच धन्यवाद देतो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे आजकाल कोणी कोणा करिता काहीही करत नाही, पण सर मात्र अगदी २४ तास वेळ देतात, भगिरथ ने पूर्वजां करिता कष्ट घेतले सर समजाकरिता घेत आहेत.
त्याच्या कार्याला अामचे शतशः नमन