मनोगत

सुरज श. मोरखडे



नागपूर



आदरणीय वेरुळकर सर नमस्कार, सर्व प्रथम सकल मराठा सोयरीक या website करिता आपले अभिनंदन... मी आपल्या website मध्ये नोंदणी केली, पहिल्या प्रयत्नात काही तांत्रिक अडचणी आल्या, पण मी त्या आपणास कळविताच त्याची योग्य ती दखल घेत आपण, आपले चिरंजीव आणि सहकारी यांनी त्यांचे योग्य असे निराकरण केले. त्यासाठी मला वेळीच संपर्क साधला, मी दिलेल्या माहितीचे स्वागत केले. मी संपुर्ण website चा आढावा घेतला तर असे लक्ष्यात आले की website ला नुसते व्यावसायिक स्वरूप न देता आपण जपला आहे तो तिचा साधेपणा. म्हणजे अगदी सर्व साधारण व्यक्ती (user) पण सहज तिला हाताळू शकतो. यामध्येच आपल्या सेवा भावनेचे आणि त्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे दर्शन होते. सकल मराठा समाजासाठी करत असलेल्या या सामाजिक कार्याकरिता मी समस्त उपवर आणि उपवधू यांच्या व त्यांच्या परिवारातर्फे आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. सुरज श. मोरखडे Android Application Developer, Nagpur

दिलीपराव गुलाबराव पाटील.



अमरावती



श्री.षडानन वेरुळकर भाऊसाहेब, सप्रेम नमस्कार ! जग फारच जलद गतीने बदलत आहे. इतक्या जलद गतीने की त्याच्या पाऊलांची चाहूल देखील आपल्याला लागत नाही. म्हणून आपला दृष्टीकोन बदला आपले विचार बदला Mr. Tony Saba , Stanford University मध्ये व्याख्याता आहेत. ते जगभरात त्यांचे व्याख्याने देतात ते आपल्या व्याख्याना ची सुरुवात चित्र दाखवून करतात. असेच चित्र सन.1900 , Newark City ,5th. Avenue रोडवर फक्त घोडा गाडी दिसायची पण सन.1913 मध्ये कार दिसु लागल्या व घोडा गाडी बाहेर झाली. भाऊसाहेबांच्या चणाक्ष बुद्धीने हीच गोष्ट ओळखली व नवीन वेबसाईट चे चित्र समाजाच्या भल्या साठी आणले. परीवर्तन हा जगाचा नियम आहे. आपल्याला सुद्धा या जगासोबत बदलने आवश्यक आहे अन्यथा समाज मागे जाण्यास वेळ लागणार नाही. नेमकी हीच गोष्ट भाऊसाहेबांना स्वस्थ बसू देत नव्हती मग नौकरी करीत असतांना समाजात विवाह जोडण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा विचार करून दि.१ जानेवारी २०१७ पासून व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून उपवर-वधुं करीता विनामुल्य परीचय पत्र उपलब्ध करुन दिलेत यात त्यांनी २५०० सदस्य जुळवले व समाजातील १९० विवाह जोडून नवा विक्रम करुन व कोरोना मुळे लाॅकडाउन च्या काळात संगणकाच्या माध्यमातून विनामुल्य व्हीडीओ काॅन्फरसिंग व्दारे सकल मराठा परिचय मेळाव्याचे आयोजन करून या क्षेत्रांत नवीन क्रांती घडवून आणली. याच वेळी भाऊसाहेबांना डोळ्यांचा व पाठीचा त्रास होऊ लागला. त्यातच सभासदांचा नवीन वेबसाईट सुरु करण्यासाठी आग्रह होता. नवीन वेबसाईट तयार करणे हे पाहिजे तेवढे सोपे नव्हते .त्या करीता वेबसाईट चे रजिस्ट्रेशन पासुन सुरुवात करावी लागते वेबसाईट बनवण्यासाठी वेबसाईट कंपनी शोधणे व त्यातील टेक्निशियन तसेच इंजीनियरच्या साह्याने आपल्याला हवी ती माहिती त्यांना पुरवुन ती तयार करून घ्यावी लागते या करीता जवळपास दिड ते दोन लाख खर्च अपेक्षित होता. यातच सभासदां कडून नवीन वेबसाईट तयार करण्याची मागणी होत होती. शेवटी भाऊसाहेबांनी समाजहिता साठी आपल्या आरोग्याची चिंता न करता नवीन वेबसाईट बनविण्याचा निर्णय घेतला त्या करीता त्यांनी आपली दोन्ही मुलं जी पुणे येथे इंजिनिअर आहेत त्यांना बोलावून घेतले. दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना समाज हितासाठी आपली नोकरी सांभाळून सहकार्य करण्याचे मान्य केले मोठा मुलगा चि.उत्कर्ष M.E. (E&TC) ,व धाकटा चि.वैभव M.E.(Civil) या दाेघांचेही सहकार्य या नवीन वेबसाईट बनवण्यात फार मोलाचे ठरले. दोघांनी आप आपली कामे वाटुन घेतली , कारण की भाऊसाहेबांनी सदस्यांना दिलेल्या दि.१ आॅक्टोंबर २०२० ह्या तारखेच्या आत काम पुर्ण करून द्यायचे होते. चि.उत्कर्ष याने पुणे येथील नामांकित सॉफ्टवेअर कंपनीला हे काम सोपविले व रात्रंदिवस जागुन भाऊसाहेबांना हव्या असलेल्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून त्यांच्या सल्याप्रमाणे ही वेबसाइट तयार करून घेतली. चि.वैभवचे काम त्याही पेक्षा अवघड होते. भोजन कीतीही सुंदर असो ते ताटात कसे वाढले जातात त्यावर त्याची पारख होते, त्याचा ही एक क्रम आहे, त्याच्या क्रमाने ताटात शोभेल असे सजवून वाढले तर जेवण्याचा आनंद दुप्पट होतो , व करणाऱ्या बाईची सुग्रणता दिसून येते तसेच या बाबत ही आहे. चि.वैभवने पण या वेबसाईटला ताटातले पदार्थ व त्या भवतालच्या काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळी प्रमाणे सजवुन देण्याची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडली आहे. व सर्वात लहान मुलगा चि.गाैरव B.E.(Computer) याने संगणक कार्यप्रणाली मध्ये थोडी फार मदत केली आहे. तसेच या व्यतिरिक्त या योगदानात ज्या माऊली चा सर्वात मोठा वाटा आहे त्या म्हणजे सौ.मुक्ताताई वेरुळकर त्यांच्या सहकार्या शिवाय हे शक्यच नव्हते म्हणून आपण सर्वांचे सर्व प्रथम मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. भाऊसाहेबांनी प्रकृती अस्वस्थ असतानाही वेळेच्या आत वेबसाईट सुरु करुन भारतातच नव्हेतर विदेशातही वेरुळकर सकल मराठा साेयरीक या वेबसाईटचे नावलौकीक करुन दाखवले आहे. तसेच यापुढे ग्रुप मार्फत वेळोवेळी विनामुल्य आॅनलाईन वर-वधू परीचय मेळावे ही आयोजित करण्यात येणार आहेत. मग आपण मागे राहुन कसे चालेल. रामकृष्ण परमहंसाचे शिष्य स्वामी चेतनानंद महाराज म्हणतात वेळ जी आहे ती गोष्टी Dilute करीत जाते Things go diluted as we go away from sources हे Dilution पुन्हा होऊ नये म्हणुन समाज बांधवांना कळकळीची विनंती की त्यांनी आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्या साठी वेळ न गमावता योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा वेळ गेल्यावर पुन्हा परत येत नाही व इतिहास बदलतो. पुन्हा आपणास विनंती की ही वेबसाईट सकल मराठा समाजातील वर-वधू वधु मुला- मुलींच्या विवाहासाठी येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी अत्यल्प कमी शुल्क आकारुन सकल मराठा समाजाला सेवा देण्या करीता तयार केलेली आहे . म्हणून सकल मराठा समाजातील उपवर वधु मुला मुलींच्या पालकांना विनंती करण्यात येते की आपल्या पाल्याची जास्तीत जास्त संख्येने आॅनलाईन नोंदणी करुन या सेवेचा लाभ घ्यावा. तसेच ही वेबसाइट नवीन असल्यामुळे नाेंदणी करतांना कींवा काेणतीही अडचण अाल्यास त्वरीत फाेन करावा. शिवाय सर्व सभासद व वर-वधू मुला-मुलीं करीता काही दिवसातच वेबसाईट बाबतीत सविस्तर मार्गदर्शन व्हिडिओ काॅन्फरसिंग व्दारे अाॅनलाईन देणार आहे. तेव्हा सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती आहे. श्रीमान वेरुळकर भाऊसाहेब आपण सकल मराठा समाजाला ऊपलब्ध करून दिलेल्या सेवे बद्यल आपले पुनःश्च हार्दीक अभिनंदन व आपल्या वेबसाईटच्या भरभराटीसाठी शुभकामना. धन्यवाद. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••• दिलीपराव गुलाबराव पाटील. अमरावती

संजय पोहरे व पाेहरे परिवार



अकोला



आदरणीय वेरुळकर सर, जय माऊली आपल्या कार्याला तोड तर नाहीच आणि मोल पण नाही, एवढं मोठं कार्य कोणी करू शकणार नाही, आपल्या समाजावर आपले फार मोठे उपकार आहे, परतफेड होऊच शकणार नाही, आपले खुप खुप अभिनंदन माऊली आपणास सदैव सुखी ठेवो, हीच माऊली ला प्रार्थना करतो - जय श्री गजानन माऊली संजय पोहरे व पाेहरे परिवार, अकोला.

षडानन रूपचंद वेरुळकर (सेवानिवृत्त कलाशिक्षक) , संचालक , "वेरुळकर सकल मराठा साेयरीक महाराष्ट्र "



रा.येरळी ता.नांदुरा जि.बुलढाणा ह.मु.पुसद जि.यवतमाळ 9421774523



आदरणीय श्री.भाऊराव पाळेकर भाऊसाहेब सप्रेम नमस्कार ! आपण खुप सुंदर मनाेगत लिहिले आहे. प्रथम आपले अभिनंदन व खुप खुप धन्यवाद ! आपले मनाेगत वाचुन मला खुप समाधान वाटले व त्याच बरोबर माझा थकवा नाहिसा हाेऊन माझे मनाेबल खुप वाढले. आपण माझ्या मनातील भाव ओळखून तेच मला प्रस्तावित करणे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. त्यामुळे आपण प्रस्तावित केल्या नुसार जसे ••••••••••• " वेबसाइट ही तर सुरू राहणारच आहे .पण आम्हाला असं वाटतं की आपण आपले प्रकृती स्वास्थ्य सांभाळून मधून मधून एखाद्या वेळी विनामूल्य ऑनलाईन वर-वधू परीचय मेळावा ठेवावा. महिना दीड महिन्यातून एखादा विनामूल्य अाॅनलाईन वर-वधू परीचय मेळावा घेतला तरी चालेल. शिवाय आपण आयाेजित केलेला मेळावा हा सर्वांना आनंद मेळावाच वाटताे. जेणेकरून ग्रुपच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधता येईल. आमच्या काही अडचणी विषयी तुमच्या कडून मार्गदर्शन घेता येईल. तथा सर्व सभासदांच्या नवनवीन कल्पना अथवा काही सूचना तथा काही विचार असल्यास मेळाव्या मध्ये मांडता येतील. आणि आपल्याला अनेक नवनवीन लोकांशी संपर्क सुद्धा साधता येईल. कृपया या विषयी अवश्य विचार करावा ही विनंती." आपल्या वरील सर्व बाबींचा विचार करून व आपल्या विनंतीस मान देऊन मी हे सांगू इच्छितो की, आपण जे काही प्रस्तावित केले ते माझ्याच मनातले बाेलले असे मला वाटते ! या मुळेच तर मला खरा आनंद मिळताे ! असाच आनंद मला नेहमी मिळावा हीच माझी इच्छा आहे. कारण या मुळेच माझी प्रकृती ठीक राहील असे मला वाटते यात शंका नाही. श्री.संत गजानन महाराज यांच्या कृपेने व आपल्या सर्वाच्या सहकार्यानेच व मी आपल्या सर्वांच्या सहवासात राहील्या मुळेच " वेरुळकर सकल मराठा साेयरीक " ही वेबसाइट सुरू झाली आहे. याचे सर्व श्रेय सर्व सकल मराठा समाज बंधू-भगिनींना आहे. त्या बद्दल मी सर्व आदरणीय सभासदांचे शतशः आभार मानतो. व धन्यवाद देताे. सकल मराठा समाजातील वर-वधू मुला-मुलींनी ही वेबसाईट काळजी गरज समजून आपली नाेंदणी करून आपल्या सदविवेक बुध्दीने विचार करून आपला जीवन साथीदार निवडून आपले आई-वडीलांचा व माझा आनंद व्दिगुनीत करावा. ही अपेक्षा करुन पुढील चतुर्थ विनामूल्य अानलाॅईन वर-वधू परीचय मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे या व्दारे अवाहन करताे ! तसेच सर्व पालकांना विनंती करताे की, आपले मुला-मुलींना याेग्य जीवन साथी निवड करण्यासाठीच या वेबसाईट ची निर्मिती केली आहे. व ही वेबसाईट केवळ सकल मराठा समाजासाठीच आहे. त्यामुळे या वेबसाईट मध्ये आपले वर-वधु मुला-मुलींना नाेंदणी करण्यासाठी काेणत्याही प्रकारची शंका निर्माण करु नये. संगणक ही काळाची गरज समजून प्राेत्साहन द्यावे व त्यांचे कडून नाेंदणी करून घ्यावी व पुढील चतुर्थ विनामूल्य अानलाॅईन वर-वधू परीचय मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे या व्दारे आपणास आवाहन करताे ! तसेच आपली वेबसाइट नवीन असल्यामुळे नाेंदणी करतांना कींवा काेणतीही अडचण आल्यास मला त्वरीत फाेन करावा. शिवाय सर्व सभासद व वर-वधू मुला-मुलीं करीता आपण काही दिवसातच वेबसाईट बाबतीत सविस्तर मार्गदर्शन व्हिडिओ काॅन्फरसिंग व्दारे अाॅनलाईन देणार आहे. तेव्हा सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती आहे. साकारा आपली नवीन नाती इथेच मिळवा आपला जीवन साथी वेरुळकर सकल मराठा साेयरीक महाराष्ट्र आपला विश्वासू - षडानन वेरुळकर, संचालक रा.येरळी ता.नांदुरा जि. बुलडाणा ह.मु पुसद जि. यवतमाळ. 9421774523, 7499881909

भाऊराव पाळेकर,अकोला





आदरणीय वेरुळकर सर सप्रेम नमस्कार शेगावीचे संत श्री गजानन महाराज यांच्या कृपेने आणि सर्व सभासदांच्या आग्रहास्तव राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरीक संस्था पुसद जिल्हा यवतमाळ या व्हाट्सअप ग्रुपचे दिनांक १.१०.२०२० गुरुवार पासून "वेरुळकर सकल मराठा सोयरीक" या नावाच्या वेबसाईटमध्ये परिवर्तन झाले आहे. त्याबाबत ग्रुपच्या सर्व सभासदांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच अभिनंदनपर मेसेज सुद्धा प्राप्त होत आहे. ही आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. अखेर यापूर्वीचे आपले कष्ट,आपली मेहनत,आपली जिद्द आणि आपल्या कुटुंबातील सर्वांच्या सहकार्याने आपली निस्वार्थ सेवा, सार्थक होऊन वेरुळकर सकल मराठा सोयरीक ही वेबसाईट उदयास आली आहे ही खूप मोठी क्रांती आहे. याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि खुप खुप धन्यवाद सुद्धा. आपली नवीन वेबसाईट आधुनिक तंत्रज्ञासह सर्व सोयींनी परिपूर्ण अशी आहे. सुरुवातीला श्री सिद्धिविनायकाचे व शेगावीचे संत श्री गजानन महाराजांचे दर्शनी फोटो खूप विलोभनीय व आकर्षक स्वरूपाचे आहे. खूप सुंदर अशी फोटोग्राफी आहे. सर्वांना समजेल असे वेबसाइटचे स्वरूप आहे. सर्वसामान्यांच्या शंका-कुशंका ची खुलासेवार माहिती त्यामध्ये दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे माहिती अतिशय सुरेख पद्धतीने साकारल्या गेली आहे. विशिष्ट आणि मुद्देसूद परिचय पत्र असल्यामुळे त्यातील माहिती मध्ये एक सारखेपणा दिसून येतो. परिचय पत्रातील माहिती अपूर्ण आहे, असे कुठेच वाटत नाही. सभासदांचे मनोगत व त्यांच्या छायाचित्रांमध्ये सुद्धा एकसूत्रता दिसून येते. अतिशय सुंदर अशी फोटोग्राफी आहे. जणूकाही आपण लग्नाचा अल्बमच पाहतो आहे .असेच वाटते. या बाबत दिवस रात्र मेहनत घेऊन ज्यांनी हे कार्य उदयास आणले आहे अशा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे खूप खूप धन्यवाद व अभिनंदन सुद्धा. सर ,जरी आपला उद्देश सफल झाला असला तरी, जिव्हाळ्याने आमची तुम्हाला एक विनंती आहे की, आपण आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळो वेळी काळजी घेत चला. दिनांक १ जानेवारी २०१७ पासून आम्ही सर्व सभासद तथा समाज बांधव आपल्याशी नातं जोडून आहोत.आणि हे नातं कायमस्वरूपी राहणार आहे. या मध्ये दुमत नाही. बहुतांश सभासदांना सकाळ झाली की आपली लिंक उघडून परिचय पत्र बघण्याची, तसेच ग्रुपमधील सभासदांचे मनोगत तथा आपल्याकडून आवश्यक त्या सूचना पाहण्याची,एक प्रकारची रोजची सवय झाली आहे.आपल्याविषयी सर्व सभासदांना एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा जिव्हाळा व प्रेम कायम रहावे याकरिता आपण आपला व्हाट्सअप ग्रुप बंद करू नका असे मनापासून वाटते वेबसाइट ही तर सुरू राहणारच आहे .पण आम्हाला असं वाटतं की आपण आपले प्रकृती स्वास्थ्य सांभाळून मधून मधून एखाद्या वेळी विनामूल्य ऑनलाईन वर-वधू परीचय मेळावा ठेवावा. महिना दीड महिन्यातून एखादा विनामूल्य अाॅनलाईन वर-वधू परीचय मेळावा घेतला तरी चालेल. शिवाय अापण अायाेजित केलेला मेळावा हा सर्वांना अानंद मेळावाच वाटताे. जेणेकरून ग्रुपच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधता येईल. आमच्या काही अडचणी विषयी तुमच्या कडून मार्गदर्शन घेता येईल. तथा सर्व सभासदांच्या नवनवीन कल्पना अथवा काही सूचना तथा काही विचार असल्यास मेळाव्या मध्ये मांडता येतील. आणि आपल्याला अनेक नवनवीन लोकांशी संपर्क सुद्धा साधता येईल. कृपया याविषयी अवश्य विचार करावा ही विनंती. ग्रुपमधील सर्व सभासदांना तथा समाज बांधवांना याद्वारे विनंती करण्यात येते की, आपण सर्वांनी वेरुळकर सकल मराठा सोयरीक या वेबसाईट च्या माध्यमातून आपल्या पसंती नुसार योग्य असा विवाह अनुरूप जोडीदार शोधण्याच्या लाभ घ्यावा. आपण ही वेबसाईट बघितली असेलच. आणि बघितले नसेल तर आवर्जून बघा. अतिशय सुरेख अशी वेबसाईट आहे. या वेबसाईटद्वारे जास्तीत जास्त विवाह अनुरूप संबंध जोडण्यास खूप मोलाची मदत होईल. अशीच या वेबसाईटची ख्याती आहे. या बाबत लॉक डाऊन च्या काळात एक विशेष ऑफर म्हणून एका वर्षा करिता नाममात्र शुल्क रु.५००/- ठेवण्यात आले आहे. आणि हे शुल्क सर्व सामान्यांना परवडण्यासारखे आहे. ही ऑफर फक्त ३१ डिसेंबर २०२० पर्यंत असणार आहे. त्यानंतर १ जानेवारी २०२१ पासून नोंदणी शुल्क रु.१०००/- भरावे लागेल. अाणि ही शुल्क सुध्दा इतर वेबसाइट पेक्षा खुप कमी अाहे. म्हणजेच सर्व सामान्यांना परवडण्यासारखे अाहे कारण ही एक वर्षाची शुल्क अाहे. एक वर्ष अापल्याला उत्तम सेवा मिळणार आहे. सरांचे कामाचे बाबतीत अापल्याला प्रत्येकाला अनुभव आहेच. करिता सर्व सभासदांनी तथा समाज बांधवांनी आणि बहुसंख्य लोकांनी आपापल्या वर-वधू मुला-मुलींची जास्तीत जास्त संख्येने ऑनलाइन अर्ज भरून नोंदणी करावी अशी अपेक्षा आहे. तसेच आपण आपल्या नातेवाईकांना व मित्र मंडळींना सुद्धा या बाबत अवगत करावे. आणि कुणीही ग्रुप सोडून जाऊ नये ही विनंती. सर आपल्या विषयी अजून एक सांगायचे म्हणजे चांगली भूमिका,चांगले ध्येय, आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात...मनातही...शब्दातही...आणि आयुष्यातही..." असेच आपले कार्य आहे व समाजासाठी एक फार मोठा आदर्श आहे. "वेरुळकर सकल मराठा सोयरीक " या वेबसाईटची अशीच दिवसेंदिवस प्रगती होवो. अधिका अधिक वृद्धिंगत होत जावो. आणि भरभराट होवो. ही सदिच्छा व्यक्त करतो. तसेच ईश्वर आपणास व आपल्या कुटुंबियांस उदंड आयुष्य आणि सुदृढ आरोग्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद ! भाऊराव पाळेकर,अकोला

कु.अंकिता भाऊराव पाळेकर



BE,ME(Comp.Sc.) Sr.Analyst at IBM India Pvt. Ltd.,Pune



आदरणीय वेरुळकर सर, नमस्कार सर,आजच्या संगणक युगात आपण काळाची गरज ओळखून "वेरुळकर सकल मराठा सोयरीक "या वेबसाइट ची नुकतेच दिनांक १.१०.२०२० गुरुवार रोजी स्थापना करण्यात आली आहे. ही खूप आनंदाची बाब आहे. समाजातील उपवर वधू मुला-मुलींची माहिती एकाच ठिकाणी वेबसाईट च्या माध्यमातून उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आदरणीय वेरुळकर सरांनी उचललेले पाउल हे सर्वांना अतिशय फायदेशीर आहे. वेबसाईट अतिशय सुंदर झाली आहे. त्यातील प्रत्येक बाबींची माहिती सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. प्रत्येक बाबींचे रेखाटन अतिशय मोहक व मनाला भावणारे आहे. प्रत्येक बाब अगदी सहजरीत्या पाहता येते. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशी ही वेबसाईट आहे. प्रत्येक वर-वधु मुला-मुलींनी प्रथम संपूर्ण वेबसाईट जरूर पहावी. मी स्वतः या वेबसाईटमध्ये माझ्या नावाची नोंदणी केली आहे. आणि प्रत्येक वर-वधू मुला-मुलींनी सुद्धा यामध्ये अापली नोंदणी करून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे मी अशी विनंती करीत आहे. तसेच अापल्या व्हाट्सअप ग्रुप मधील सर्व सभासदांनी सुद्धा आपल्या उपवर-वधू मुला-मुलींना नोंदणी साठी प्रवृत्त करावे अशी विनंती करीत आहे. आपल्यावर व आपल्या कुटुंबीयांवर ईश्र्वराची अखंड कृपा असो ही सदिच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद सर. कु.अंकिता भाऊराव पाळेकर BE,ME(Comp.Sc.) Sr.Analyst at IBM India Pvt. Ltd.,Pune

कु.संजीवनी विलास ठाकरे,



कु.संजीवनी विलास ठाकरे, शासकीय लेखा परीक्षक B.Com., M.Com., GDCA कल्याण, मुंबई



आदरणीय श्री वेरुळकर सर, वेबसाईट सुरू करून,आपली समाजाप्रती आपली भावना दिसून येते. हे सर्व समाजकार्य आपण करीत असताना आपल्या तब्बेती कडे विशेष लक्ष असावे,असे वाटते. व्हॉट्सअप ग्रुप मधील सर्व सभासदांना पण एक विनंती आहे की, मी संपूर्ण वेबसाईट बघितली असून खुपच सुंदर व सर्व साेयीनियुक्त बेवसाईट तयार करण्यात आली आहे. अापण संपूर्ण वेबसाईट बघून घ्या नंतर आपल्या मुला मुलीं कडून स्वतः वेबसाईट वर नाेंदणी करा. अापल्या सर्वांच्या वतीने वेरुळकर परिवारावाराचे पुन्हा एकदा अभिनंदन व पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा!!! ••••••••••••••••••••••••••••••••••••••••• कु.संजीवनी विलास ठाकरे, शासकीय लेखा परीक्षक B.Com., M.Com., GDCA कल्याण, मुंबई

डॉ.अरविंद ठाकरे, रा.अकोली जहागीर ता.अकोट जि.अकोला





आदरणीय वेरुळकर सर, यांना डॉ.अरविंद ठाकरे, रा.अकोली जहागीर ता.अकोट जि.अकोला यांचा सस्नेह नमस्कार आपण हाती घेतलेले हे कार्य खरोखरच वंदनीय आहे .आपण सेवानिृत्तीनंतर चे आयुष्य मौज मजेत न काढता वयाची व वया नुसार होणाऱ्या व्याधिंची तमा न बाळगता परिश्रम घेऊन समाज कार्य करण्यासाठी गढून गेले आहात. सुरुवातीच्या काळात गाव गावातील चार लोक एकत्र जमून सोयरिक जुळवण्या साठी प्रयत्न करीत पण आज हे इतिहास जमा झाले आहे. एक संबंध झाला तर एक काशी घडते असे मानीत आपल्या हातून तर शेकडो संबंध होत आहेत. तरीही हा वेग परीचय पत्रा च्या आकडेवारी नुसार कमी असल्याची खंत तुम्हाला आहे. तसेच समाजामध्ये पोटजाती वरून पडत असलेली फुट व त्या वरून भविष्यात होऊ घातलेल्या संकटाची चाहूल आपणास असल्या मुळे तुम्ही सकल मराठा ही वेबसाइट सुरू केली. आज जवळ पास २५०० परीचय पत्र संकलन करून वर्गवारी करताना होत असलेला ताण कमी करण्यासाठी घेतलेली संपूर्ण परिवाराची मदत,पालकांच्या समस्यांचे निराकरण हे सगळे खरोखर वंदनीय आहे असेच समाज कार्य पुढील भविष्य काळात देखील सुरू राहावे हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना. देव तुम्हाला व तुमच्या परिवाराला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो.पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.

Mohan Dinanath Patil , ( Yerlikar ) .....



Retd. Jail Supdt . (Principal , Jail Officers Training College , Yerawada , Pune. ) (Law & Reaserch Officer , Maharashtra Prison Head Quarter ,) Pune. ••••



Shadanan Verulkar, Congratulations , Many Many Congratulations ..... अशा प्रकारचे कार्य करून समाज सेवा करणारे , म्हणजे शिक्षण क्षेत्रात जसे डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील , मामासाहेब जगदाळे ,यांनी मोफत व पुढे नाममात्र शुल्क ठेवून बोर्डिंग सह अभ्यास पुर्ण करण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू करून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली, त्यांच्या तोडीचेच आजच्या धावपळीत समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेले व तेवढेच उपयुक्त ठरत असलेले कार्य हाती तर घेतलेच नव्हे त्यात काळानुरूप बदल करून आधुनिक युगात समाजाची आधुनिक पद्धतीने प्रथम व्हाॅटसअप ग्रुप चे माध्यमातून जवळ जवळ १० ग्रुप स्थापन करून मोठ्ठी विवाह संस्थाच स्थापन करून चार वर्षे विनामूल्य सेवा करून अाज वेबसाईट काढून जे समाज सेवेचे व्रत स्वीकारले आहे , त्याला तोड नाही , त्यासाठी खुप खुप धन्यवाद व या समाजास अत्यंत आवश्यक असलेल्या उपक्रमास खुप खुप शुभेच्छा ..... पण एक विनंती आहे की, अशीच नाममात्र शुल्क ठेवून ही समाज सेवा करावी व सर्वात महत्वाचे की अशी सेवा दीर्घ काळ करत राहावी अशी इच्छा असल्यास ,स्वतःची तब्येत सांभाळावी, एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो..... पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा व भर भरून अभिनंदन..... ••••••••••••••••••••••••••••••••••••••••• Mohan Dinanath Patil , ( Yerlikar ) ..... Retd. Jail Supdt . (Principal , Jail Officers Training College , Yerawada , Pune. ) (Law & Reaserch Officer , Maharashtra Prison Head Quarter ,) Pune. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••

भानुदास दिवाणे पाटील पुणे





आदरणीय वेरुळकर सर, नमस्कार. आपण तन-मन-धनाने सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहात. आपला त्याग, निस्वार्थीपणा आणि समाज सेवेची तळमळ याचा प्रत्यय या आधीच आलेला आहे. आज आपण वेबसाईट तयार करून नववधू वर व पालकांना त्यांच्या अपेक्षे प्रमाणे वर वधू कमीत कमी वेळेमध्ये शोधण्याचा सुलभ असा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आपला दृढ निश्चय व अथक प्रयत्नातून उभारलेल्या सेवा कार्य रुपी मंदिरावर कळस चढवून आपण हा संकल्प सिद्धीस नेला आहे. आपले कार्य कौतुकास्पद, अद्वितीय व अतुलनीय आहे. या वेबसाईटचा मराठा समाजाला खूप फायदा होईल व याद्वारे असंख्य लग्न जुळतील हीच अपेक्षा. धन्यवाद. भानुदास दिवाणे पाटील पुणे

Page 3 of 15