भाऊराव पाळेकर,अकोला
आदरणीय वेरुळकर सर
सप्रेम नमस्कार
राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरीक पुसद जिल्हा यवतमाळ या व्हॉटस् अप ग्रुपच्या माध्यमातून आजतागायत १८५ उपवर वधू मुला-मुलींचे विवाह जुळवणी चे कार्य अतिशय उत्तमरित्या पार पाडले आहेत. आणि याची आम्हा सर्व सभासदांना माहिती आहेच. याबद्दल आपले व आपल्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन.
या सर्व कार्याची धुरा सांभाळीत असताना अतिश्रमाने प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होणे साहजिक आहे. त्यामुळे आपल्याला आरामाची खूप गरज आहे कारण " जर प्रकृती स्वास्थ उत्तम तर सर्वकाही काम उत्तम "
याच उद्देशाने राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक पुसद जिल्हा यवतमाळ या व्हाट्सअप ग्रुप मधील सर्व सभासदांनी आपल्यावरील कामाचा ताण कमी व्हावा, आपली प्रकृती स्वास्थ्य उत्तम रहावे, आणि आपले काम सुनियोजित व सुकर व्हावे या हेतूने वेबसाईट या योजनेची अंमलबजावणी करावी म्हणून या योजनेकडे आपले लक्ष वेधन्यात आले आहे. आणि ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी म्हणून सर्व सभासदांची आग्रहाची विनंती आहे. आता सद्य परिस्थिती च्या लॉक डाऊन च्या काळात तर याची खूप गरज निर्माण झाली आहे.
सर्व सभासद वर्ग आपल्या कडील वेबसाईटच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असून नोंदणी करण्यास सुद्धा अतिशय उत्सुक आहे.
तसेच आपली ही वेबसाईट ईतर वेबसाईट पेक्षा निश्चितच चांगली होणार आहे. अतिशय सुटसुटीत आणि सर्व सामान्यांना समजेल आणि आर्थिक दृष्ट्या सर्वांना योग्य होईल अशीच होणार आहे. अशी आमची विचारधारा आहे.
सर, जरी आमची उत्सुकता शिगेला पोहोचली असली तरी, प्रथम आपण आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे. आणि त्यानंतर आपण आम्ही सुचवलेल्या योजनेचा लवकरात लवकर विचार करावा. अशी आमची आग्रहाची विनंती आहे.
ईश्र्वर आपणास व आपले कुटुंबीयास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करो ही प्रभु चरणी प्रार्थना करतो !
धन्यवाद !
दिलीपराव गुलाबराव पाटील. अमरावती
श्री.षडानन वेरूळकर भाऊसाहेब,
सप्रेम नमस्कार।
राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक मुळे आपणा सोबतच बऱ्याच नवीन विद्वान सहकार्यां सोबत परिचय झाला. हा पण आपल्या उपक्रमाचा भागच समझावा. लाॅक डाऊनच्या काळात आपण व्हिडीओ काॅन्फरंसिंग च्या माध्यमातून परिचय मळाव्याचे आयोजन केले होते. त्यात कु.अंकिता भाऊरावजी पाळेकर हिने परिचय दिला तो पाहील्यावर तिचे हावभाव , बोलण्यातला गोडवा , आवाजातील स्पष्टता तिच्या विव्दत्तेची जाणीव करून देत होती. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी !
त्याच दिवशी माझ्या मनात विचार आला की आपला परिचय या मुलीच्या वडीलां सोबत असायला हवा. मग मी श्री.भाऊरावजी पाळेकरां बद्दल माहिती गोळा केली ती मला पटली व मी त्यांच्याशी संपर्क साधला. श्री भाऊरावजी चंपतराव पाळेकर से.नि. कार्यालयीन अधिक्षक अकाेला. एक निस्वार्थी, प्रामाणिक ,समाजाबद्दल बांधीलकी जपणारा व आस्था असणारा तसेच अभ्यासक असल्याचे जाणवले. जन्माे जन्मी ची पुण्याई असल्या शिवाय असे योग येत नाही.
कोणत्याही प्रकारचे ओळख परिचय नसतांनाही त्यांनी मला वेळोवेळी निस्वार्थी पणे सहकार्य केले त्या बद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. हा योग राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक ग्रुप मुळे शक्य झाला. त्यामुळे भाऊसाहेब मी आपला पण मनः पासून आभारी आहे. धन्यावाद !
दिलीपराव गुलाबराव पाटील. अमरावती
भाऊराव पाळेकर,अकोला
आदरणीय वेरुळकर सर,
सप्रेम नमस्कार
आपल्या कार्याबद्दल खालील प्रमाणे माझ्या भावना व्यक्त
करीत आहे
"काम करा काम तर जीवन बनेल महान"या उक्तीप्रमाणे जीवनामध्ये मनुष्याला अनेक प्रकारची कामे करावी लागतात. कर्माविना त्याची जीवन यात्राच पुढे चालू शकत नाही. त्याची इच्छा असो वा नसो, त्याला कुठलेना कुठले तरी काम करावेच लागते. कारण कर्म हे अटळ आहे त्याला नाकारून चालणार नाही.
तसे पाहिले तर आपल्या जीवनाचा व कामाचा अगदी जवळचा संबंध आहे.आणि काम केल्याशिवाय जीवन यशस्वी होणार नाही हे आपल्याला ठाऊक आहे. कोणी कितीही श्रीमंत असो, गरीब असो, धनवान असो, किंवा हातापायांने अपंग असो, अंधत्व असो त्यालाही सुद्धा मेहनतीशिवाय पर्याय नाही
त्यामुळे "दे रे हरी पलंगावरी" असे म्हणून नुसते बसून राहिलो, तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही .आपले जीवनच संपुष्टात आल्यासारखे होईल. म्हणून आपण निरंतर कर्म केले पाहिजे, सर्व शक्ती एकवटून कर्म केले पाहिजे, कोणत्याही प्रकारचे काम असो ते आपण मन लाऊन केले पाहिजे असे गीतेमध्ये सांगितले आहे.
आणि हीच भगवत गीतेची शिकवण लक्षात घेऊन आदरणीय वेरुळकर सरांनी आपल्या वडिलांच्या स्वप्नपूर्ती चे ध्येय साकार करण्यासाठी स्वतःला या कार्यामध्ये वाहून घेतले. तेव्हा कुठे फलित साध्य झाले.
यामध्ये सरांनी आपल्या कार्यात कुठेही कसर ठेवली नाही. म्हणूनच तर राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरिक पुसद जिल्हा यवतमाळ ही व्हाट्सअप ग्रुप ची संस्था आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर देश विदेशात सुद्धा नावारुपास आलेली आहे
वेरुळकर सरांनी या यशापर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणती कामे केली याची माहिती आपल्या सर्व सभासदांना चांगलीच ठाऊक आहे.
¶ अनेक नवनवीन योजनेच्या पूर्ततेसाठी कितीही अडचणी आल्या तरी सरांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही ते पुढे आणि पुढे जातच राहिले.
¶ त्यांनी अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढून अनेक नवनवीन योजना प्रगतीपथावर आणल्या आहेत.
¶ विशेष म्हणजे लॉक डाऊनच्या काळातील त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य ठीक नसतांना सुद्धा केलेले व करीत असलेले कार्य आपल्या सर्व सभासदांच्या चांगलेच लक्षात आहे.
¶ याचं आणखी एक फलित म्हणजे आज सरांनी राजमाता जिजाऊ सकल मराठा संस्था पुसद जिल्हा यवतमाळ या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून १८४ विवाह जुळवणी चे कार्य पूर्ण केले आहे. या बाबत सरांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
¶आता याही पुढे अजून एक पाऊल पुढे टाकून अर्थात आपले प्रकृती स्वास्थ्य उत्तम झाल्यानंतर वेबसाईट ही योजना सर्व सभासदांच्या विनंती वरून व त्यांच्या आग्रहाखातर सरांनी पूर्ण करावी, अशी अपेक्षा आहे. आणि सर ती लवकरच पूर्ण करतील अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया !
ईश्र्वर आपणास व आपल्या कुटुबियांस उदंड आयुष्य आणि सुदृढ आरोग्य प्रदान करो ही प्रभु चरणी प्रार्थना.
धन्यवाद.
भाऊराव पाळेकर,
दिलीप गुलाबराव पाटील.
अमरावती.
श्री.षडानन वेरूळकर भाऊसाहेब,
सप्रेम नमस्कार !
सर्व प्रथम आपणास ,आपल्या कुटुंबाला व राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक ग्रुपच्या सर्व सन्माननीय सभासदांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शिक्षक कसा असावा हे भाऊसाहेबां कडे पाहिल्यावर लक्षात येते. आज सुंदर पोस्ट वाचण्यात आली...... किसीने शिक्षक से पुछा..क्या करते हो आप ? शिक्षक का सुंदर जवाब देखीये...
सुंदर सुर सजाने को साज बनाता हुं । नौ सिखीये परिदों को बाज बनाता हुं । चुपचाप सुनता हुं शिकायते सबकी । तब दुनिया बदलने की आवाज बनाता हुं ।। समंदर तो परखता है हौसले कस्तीयों के । और मै तो डुबती कस्तीयों को जहाज बनाता हुं ।। बनाये चाहे चांद पे कोई बुर्ज ए खलीफा । अरे मै तो कच्ची ईटों से ही ताज बनाता हुं ।।
आमचे भाऊसाहेब सुद्धा असेच आहेत. त्यांनी सुद्धा कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक ग्रुपचे माध्यमातून व्हिडीओ काॅन्फरंसिंग चा वापर करून १८३ विवाह जोडलेत त्या बद्ल भाऊसाहेबांचे आजच्या शिक्षक दिनी मनःपूर्वक हार्दीक अभिनंदन व धन्यवाद !
दिलीप गुलाबराव पाटील.
अमरावती.
भानुदास दिवाणे,
पुणे
आदरणीय वेरुळकर सर
नमस्कार !
आपण जे समाज कार्य करत आहात ते अत्यंत प्रशंसनीय आहे. आज पावेतो आपल्या प्रयत्नातून १७८ लग्न जुळली आहेत. आपला हा उपक्रम अखंडपणे चालू आहे त्यामुळे आपल्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. काही मान्यवरांनी सुचविल्याप्रमाणे आपण वेबसाईट सुरू करावी. त्यामुळे आपल्या वरचा ताण कमी होईल तसेच सर्व सभासदांना आपल्या अपेक्षे प्रमाणे जास्तीत जास्त उमेदवारांची माहिती कमी वेळात उपलब्ध होईल. काही मान्यवरांनी सुचविल्याप्रमाणे या कामासाठी होणारा खर्च प्रत्येक सभासदाकडून नाममात्र शुल्क आकारून भरून काढावा. ईश्वरास प्रार्थना करतो की या कामासाठी आपणास चांगले आरोग्य लाभावे ! नमस्कार !
भानुदास दिवाणे, पुणे
भाऊराव पाळेकर
अकोला
आदरणीय वेरुळकर सर
सप्रेम नमस्कार
राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक पुसद जिल्हा यवतमाळ या व्हाट्सअप ग्रुप मधील सभासदांनी आपल्यावरील कामाचा ताण कमी व्हावा या उद्देशाने वेबसाईट या योजनेकडे आपले लक्ष वेधले आहे
याबाबत वेबसाईट योजनेचे काय महत्त्व आहे ? त्यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट असतात याची थोडक्यात माहिती आपल्या सभासदांना मिळावी करिता खालील प्रमाणे विषद करण्यास एक छोटासा प्रयत्न करण्यात येत आहे. तशी माहिती ही अगदी प्राथमिक स्वरूपाची असून गुगल वरून प्राप्त केली आहे. त्यामुळे आजच्या संगणक युगात बहुतेक सर्वच सभासदांना याची माहिती असेलच.
थोडक्यात वेबसाईट म्हणजे काय ? याचा खुलासा आपण पाहू या !
आजच्या संगणक युगात आपण सर्वजण कोणत्याही माहितीसाठी इंटरनेटवर अवलंबून राहत असतो याची सर्वांना कल्पना आहेच तर वेबसाईट म्हणजे असे ठिकाण की जिथे बरीच माहिती संकलित केलेली असते उदाहरणार्थ एखादे हॉटेल, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, विवाह विषयक स्थळे, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या ,इत्यादी बाबत त्या-त्या स्थळा संबंधित संपूर्ण माहिती वेबपेजेस मध्ये संग्रहित करून वेबसाईटवर ठेवली जाते.
थोडक्यात असेही म्हटले जाऊ शकते की वेबसाइट हे एक असे मध्यवर्ती ठिकाण आहे जिथे बरीच माहिती वेब पेजेस मध्ये संग्रहित असते आणि वेबसाईट च्या वेब पेजेस वर कनेक्ट होऊन ती माहिती कुणालाही पाहता येऊ शकते.
सर्व प्रथम आपणास ज्या स्थळा संबंधी माहिती हवी असेल त्या स्थळाचे वेबसाईट वर जावे लागेल आणि एकदा ती वेबसाईट उघडल्यानंतर आपल्याला या स्थळाच्या माहिती विषयी बर्याच काही गोष्टी दिसून येतील जसे -
All pages, main pages, About us, Contact us की ज्यावर आपल्याला पाहिजे असलेल्या स्थळाविषयी संपूर्ण माहिती असेल. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या या पेजेस ला वेबपेजेस असेही सुद्धा म्हणतात.
वेबसाईट कशी उघडावी ?
वेबसाईट उघडण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल क्रमांक किंवा संगणक ब्राउजर उघडावा लागेल उदाहरणार्थ- (क्रोम, मोझिला इत्यादी) आणि नंतर ब्राउझर मध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या वेबसाइटचे नाव टाकावे लागेल जसे www.sakal maratha soyarik.com.
आता ब्राउझर कशाला म्हणतात ?
तर ...ब्राऊझर म्हणजे आपण ही वेबसाईट ज्या मध्ये उघडली त्याला ब्राउझर असे म्हटले जाते.
वेबसाईट आणि वेबपेजेस मध्ये काय फरक आहे ?
वेबसाईट म्हणजे सर्व पेजेस चा संग्रह ज्याला आपण "पुस्तक " या नावाने सुद्धा संबोधू शकतो .
....आणि या पुस्तकामध्ये जी काही पृष्ठे उपलब्ध आहेत म्हणजेच पाने आहेत त्याला "वेबपेजस" असे म्हणतात.
तर आपल्याला सद्यस्थितीत विवाह विषयक संस्थेतील स्थळांविषयी चा विचार करावयाचा असल्यामुळे त्यासाठी सरांनी ही वेबसाइट तयार केली तर आपल्याला घर बसल्या, कुठल्याही त्रासा विना, कुठलीही घाई गर्दी न करता, अगदी शांततेत निवांत घरी बसून आपल्याला हवी असलेली उपवर-वधू मुला-मुलींची माहिती, जातीनिहाय, जन्मतारखे निहाय , जिल्हा निहाय, शैक्षणिक अहर्तेनिहाय, व वयानुसार पहावयास त्वरित उपलब्ध होऊ शकेल.
पूर्वी सारखे ५००, ६०० परिचय पत्र पाहण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे आपल्याला आपल्या योग्यते नुसार हवी असलेल्या स्थळांची माहिती अवघ्या काही मिनिटांत प्राप्त होऊ शकते.
अशाप्रकारे सरांनी ही वेबसाईट ची योजना कार्यान्वित केली अथवा तयार केली तर सर्व सभासदांना अतिशय फायदेशीर व मोलाची ठरेल यात मुळीच शंका नाही.
सरांचा वेबसाईट च्या बाबतीत अंतिम निर्णय झाल्यास आपल्याला सरांकडून योग्य ते मार्गदर्शन तथा आवश्यक त्या सूचना प्राप्त होतीलच. अशी अपेक्षा करू या ! आणि सरांच्या या योजने मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन योग्य ते सहकार्य करू या !
धन्यवाद.
राजेंद्र देवरावजी तालंगकर, शिक्षक
श्री.वेरुळकर सर
नमस्कार !
आपण करत असलेले सामाजिक कार्य खरोखरच अनमोल आहे सर, आपल्या या कार्यामुळे आपल्या समाजातील उपवर मुलामुलींचा परिचय संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना देशात होत आहे. त्या मुळे आपल्या पसंतीचे पाहुणे व मुलं-मुली पाहून लग्न जुळत आहेत व आई-वडीलांचे मनावरील तान कमी होत आहे. मराठा समाजासाठी करत असलेल्या कार्या करीता आपले शतशः आभार मानतो. व अापणास धन्यवाद देतो सर !
राजेंद्र देवरावजी तालंगकर, शिक्षक
डुब्बेवार ले-आऊट,पुसद जि.यवतमाळ
विद्याधर बाठे, स्थापत्य अभियंता
लाेणी काळभोर, पुणे
तिर्थस्वरुप मामासाहेब
शिरसाष्टांग नमस्कार !
अापण ३१ मार्च २०२० ला सेवानिवृत्त झाले आहात. परंतु आपण १ जानेवारी २०१७ पासून व्हॉटसअॅप ग्रुप चे माध्यमातून मराठा समाजातील उपवर-वधु मुला-मुलींचे साेयरीक चे कार्य सतत अहाेरात्र करीत आहात. हे सर्वांना माहीतच आहे. ठीक आहे समाज सेवा ही एक ईश्वर सेवाच आहे. परंतु काेणतेही कार्य करण्यासाठी आपली प्रकृती तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.
सध्या अापली प्रकृती ठीक नाही. आपल्याला डाेळयाचा, मानेचा व नुकतेच आपण बाथरुम मध्ये पाय घसरुन पाठीवर पडल्या मुळे सध्या पाठीचा त्रास सुध्दा होत आहे असे मला समजले. माझी आपणास नम्र विनंती आहे की, सर्व प्रथम प्रकृती ची काळजी घ्या आपल्याला सध्या बेडरेस्ट ची गरज आहे. प्रकृती ठीक झाल्या नंतर समाज सेवा करा.
परंतु आपण स्वतः काेणतेच काम नकरता व्हॉटसअॅप ग्रुप चे माध्यम बदलवून वेबसाईट चे माध्यमाव्दारे हे कार्य सुरू ठेवावे. ही अापणास नम्र विनंती आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••
विद्याधर बाठे, स्थापत्य अभियंता
लाेणी काळभोर, पुणे
भाऊराव पाळेकर,अकोला
आदरणीय वेरुळकर सर
एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व"
राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरीक पुसद जिल्हा यवतमाळ या व्हाट्सअप ग्रुप चे गट संचालक म्हणून दिनांक १.१.२०१७ पासून ते आजपर्यंत तीन ते साडेतीन वर्षात सरांनी अविरतपणे, अव्याहतपणें, अविश्रांत, आणि अहोरात्र कष्ट करून आज ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात सुद्धा "ख्याती प्राप्त संस्था" म्हणून ओळख निर्माण केली आहे. याबाबत सरांचे खूप खूप धन्यवाद.
अवघ्या तीन ते साडेतीन वर्षात सरांनी एकाच कार्यपद्धतीचा अवलंब न करता त्यामधे नवनवीन बदल करून विविधता आणली आहे.अनेक परिवर्तनशील नाविन्यपूर्ण योजना पुढे आणल्या आहेत याची आपणा सर्वांना माहिती आहे. प्रत्येक योजना ही आपल्यासाठी कशी फायदेशीर ठरेल? याबाबतीत प्रत्येक पाऊल उचलतांना सारासार विचार करून निर्णय घेत असत. मग त्यामध्ये कितीही त्रास होऊ देत ! कितीही अडथळे येऊ देत ! कितीही समस्या निर्माण होऊ देत परंतु सरांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. त्यांना सामोरे जाण्याचे धाडस करून सरानी आपल्या मनोवांचीत योजना पुर्ण पणें यशस्वी करून दाखवल्या आहेत. काळ- वेळेची पर्वा न करता,कधीही त्यांनी माघार घेतली नाही. डळमळीत झाले नाहीत.त्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून
अतिशय प्रभावीपणे व उदात्त अंतकरणाने आपले कार्य केले आहे.आणि करीत आहेत
ह्या सर्व कार्याची धुरा सांभाळीत असताना सरांच्या बाबतीत एक बाब विशेषत्वाने नमूद करावीशी वाटते की, सरांनी त्यांचे नोकरी विषयक व घरगुती आणि कौटुंबिक विषयक कार्याची कधीही परवड होऊ दिली नाही.घर व कुटुंबा कडे कधीही दुर्लक्ष केले नाही त्यामुळेच तर सरांची आज तीनही मुले , उत्तम संस्कारात वाढून आज उच्च शिक्षण प्राप्त करून आपापल्या कार्यामध्ये व्यस्त आहेत खरोखरच सरांची ही जमेची बाजू नव्हे काय?
अर्थात त्यामागे सरांच्या अर्धांगिनी सौ. मुक्ताताई वेरुळकर गट संचालिका यांचे सहकार्याचा सुद्धा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. कारण *प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात ते उगीच नव्हे!...
आणि हे सर्व करीत असताना, प्रकृतीस्वास्थ्याची चढ उतार ही होणारच.त्यामुळे कुठल्याच कामाची घाईगर्दी न करता, सरांनी प्रथम आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष केंद्रित करावे त्यासाठी नियमित औषधोपचार घ्यावा आणि जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी. अशी आमच्या सर्व सभासदांची आग्रहाची विनंती आहे.
तसेच आपले प्रकृती स्वास्थ्य उत्तम झाल्यानंतर कामाचा व्याप कमी करण्यासाठी वेबसाईट ची योजना कार्यान्वित करण्यात यावी अशी राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरिक या व्हॉटस् अप ग्रुप मधील सर्व सभासदांची आग्रहाची मागणी आहे.
ईश्र्वर आपणास व आपल्या कुटुंबियास उदंड आयुष्य आणि सुदृढ आरोग्य प्रदान करो ही प्रभु चरणी प्रार्थना .
धन्यवाद.
सुभाष पांडुरंजी राऊत, साई नगर,अमरावती.
आदरणीय श्री. वेरुळकर सर,
साष्टांग नमस्कार सर, माझी मुलगी कु.नेहा सुभाष राऊत (BDS), ही राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक E ग्रुप मध्ये समाविष्ट आहे .
आम्हाला "E" ग्रुप व्यतिरिक्त इतर ग्रुप मधील उपवर मुलांचा शोध कसा घेता येईल ही शंका मी आपणास व्हाट्स ऍप मेसेज द्वारे कळवली. आपणास डोळ्यांचा, मानेचा आणि पाठीचा त्रास होत असतांना देखील आपण लगेच प्रत्यक्ष फोन द्वारे संपर्क साधून माझ्या शंकेचे निरसन केले, ही बाब खूप कौतुकास्पद आहे. या बद्दल आम्ही आपले आभारी व ऋणी आहोत.
धन्यवाद सर
••••••••••••••••••••••••••••••••••
सुभाष पांडुरंजी राऊत, साई नगर,अमरावती.