मनोगत

श्री.सुदामदेव लक्ष्मणराव पाटील



ता.खामगांव जि.बुलढाणा



आदरणीय श्री. वेरुळकर सर माझा मुलगा ••••••••••••••••• चि.डॉ.सुशिल B.A.M.S.,D.C.H. श्री.सुदामदेव लक्ष्मणराव पाटील (मा.पाेलिस पाटील) रा.बाेरीअडगांव ता.खामगांव जि.बुलढाणा आणि चि.साै.कां.डाॅ.नेहा B.A.M.S.,M.D. श्री.विष्णू केशवराव काकडे (प्रक्रिया व्यवस्थापक, महिकाे सिडस कं.जालना) रा.धानाेरा ता.सिल्लोड जि.औरंगाबाद यांची मुलगी यांची लग्न साेयरीक आपले राजमाता जिजाऊ मराठा साेयरीक ग्रुप चे माध्यमातून जुळली असून साक्षगंधा चा कार्यक्रम संपन्न झाला आहे. हे कार्य आपल्या हातून असेच सुरू राहाे ही ईश्वर चरणी प्रार्थना ! आपला स्नेहांकीत - श्री.सुदामदेव लक्ष्मणराव पाटील बाेरीअडगांव ता.खामगांव जि.बुलढाणा

गजानन काटे



अकोला



आदरणीय वेरुळकर सर, सप्रेम नमस्कार, आजच्या धकाधकीच्या जीवनात मराठा समाजातील उपवर सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलामुलींची योग्य त्या ठिकाणी लग्न जुळविण्याचे कार्य अत्यंत अशक्यप्राय झालेले आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उभयतांनी पुढाकार घेऊन निस्वार्थपणे निःशुल्क आपला दररोज अमूल्य वेळ देऊन जी समाज सेवा शिस्तबद्धपणे करीत आहात ह्या सेवेला तोड नाही. ह्या बद्दल करावे तेवढे कौतुक कमी आहे. अशा प्रकारच्या कल्पना खुप जणांच्या डोक्यात येतात परंतु शिस्तबद्धरित्या वास्तवतेत उतरविणे कठीण असतं. परंतु अशा अशक्यप्राय कार्याची धुरा हातात घेवुन जवळपास १०० कुटुंब स्थापित करण्याचा आकडा लवकरच पार पडणार आहे. आपले व आपल्या उच्चविध्या विभूषित सुसंस्कृत कुटुंबाचे खुप खुप हार्दिक अभिनंदन व आपल्या उपक्रमास खुप खुप शुभेच्छा. आपल्या कुटुंबाची सर्व स्थरावर उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपला स्नेहांकीत, गजानन काटे लहान उमरी, अकोला 444005

साै.सुनंदा संतोष लांडे श्री.संतोष नारायण लांडे



बुलढाणा



सन्माननीय वेरूळकर सर , सर आपले मनापासून अभिनंदन !! व पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा! शुभेच्छुक - साै.सुनंदा संतोष लांडे श्री.संतोष नारायण लांडे फॉरेस्ट रेंजर, बुलढाणा

श्री.विनायकराव मिरगे.



श्री.विनायकराव मिरगे.



वेरुळकर सर नमस्कार ! मराठा समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपले मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन ! तसेच या कार्यासाठी आपल्याला प्रेरणा व शक्ति मिळत राहो या बद्दल शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री.विनायकराव मिरगे. सिडको वाळुज,महानगर औरंगाबाद

श्री.दिपक राऊत व साै.ज्याेती दिपक राऊत





आपण जे कार्य करत आहात आणि आज पर्यंत 100 लग्न जोडले याबद्दल आपले व व्हॉटस ऍप ग्रुपला माझे कोटी कोटी हदयाचे प्रणाम ! श्री.दिपक राऊत व साै.ज्याेती दिपक राऊत

अशोक गोरे



मोर्शी



वेरुळकर सर, आपल्या हातुन घडत असलेल्या निस्वार्थ कार्यास शतशः प्रणाम आणि आपल्या कडुन हे कार्य निरंतर घडत राहो ही प्रार्थना आणि शुभेच्छा अशोक गोरे, मोर्शी.

पंकज डिवरे



महाळुंगी



सर आज आपण करत असलेल्या समाज कार्याचे आणि आपल्या ग्रुप चे आज सार्थक झाले आणि आपल्या हातुन 100 लग्न जुळले त्या बद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि वधू वरांचे सुध्दा अभिनंदन शुभेच्छुक - पंकज डिवरे ,महाळुंगी

रेखा विकास तट्टे



रेखा विकास तट्टे



श्री वेरूळकर सर आणि मुक्ताताई नमस्कार सर्वप्रथम तुम्हादोघांचे मनःपूर्वक अभिनंदन मला तुमचा Whats-app group join करून आठ दिवस झालेत . त्यादिवशी लग्न ठरलेल्यांचा आकडा 101 होता . अवघ्या आठ दिवसांमध्ये तो 107 वर गेलाय . तुमच्या या निस्वार्थी आणि सेवाभावी कार्याला कोटी कोटी प्रणाम हा आकडा लवकरच 200 ,500 आणि 1000 पार करेल यात तिळमात्र शंका नाही . तुम्हाला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा . सौ . रेखा विकास तट्टे , अमरावती ( ह.मु. खराडी , पूणे)

साै.साधना बाेरकर



नागपूर



मी साै.साधना बाेरकर,नागपूर वेरुळकर सर,असेच Whats app ग्रुप च्या माध्यमातून तुम्ही या सामजिक कार्याचे शिखर गाठले आणि हे कार्य करतांना तुम्हाला मिळालेल्या सौ.मुक्ताताईंची मिळालेली साथ एक उत्तम आदर्श कुटुंब कसे असते हे तुमच्याकडून या ग्रुपमध्ये आल्यानंतरच कळाले सर तुमचे आभार मानण्यासाठी मी काही इतकी मोठी नाही पण तुम्ही घेतलेला वसा असाच कायम राहो तसेच लागलीच द्विशतक गाठो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते ! धन्यवाद ! •••••••••••••••••••••••••••••••••• साै.साधना बाेरकर, नागपूर

श्री.दीपक काळे व साै.अपर्णा काळे, मुंबई



मुंबई



समाज भूषण षडानन जी, विखुरलेल्या बहुजन समाजाची नेमकी नड ओळखून आपण सुरू केलेली सोयरीक सेवा समाजाने उस्फूर्तपणे स्वीकारली हे सोयरीक शंभरी ने सिद्ध झाले टेक्नॉलॉजी उत्तम प्रकारे वापरून समाजसेवा कशी करावी याचा वस्तुपाठ आपण समाजापुढे मांडला. 1000 वी सोयरीक आपल्या हस्ते लवकरच जुळावी ही मनापासून शुभेच्छा !

Page 10 of 15