मनोगत

P. M. Ghanokar Gen.manager sumeet group of companies Pune.





Great achievement Verulkar sir, we have proud of you.My heartiest congratulations to you&your family.Finally you have achieved the goal.

वसंतराव पाटील, उपप्राचार्य



जळगांव जामाेद जि. बुलढाणा



श्रीमान षडानन् राव वेरूळकर यांना वसंतराव पाटील, उपप्राचार्य जळगांव जामाेद जि. बुलढाणा यांचा सस्नेह नमस्कार ! आपण वेरूळकर सकल मराठा सोयरीक या नावाने जी नवीन वेबसाईट समस्त मराठा समाजा करीता सुरू केली आहे त्या करीता आपले खुप खुप अभिनंदन आणि धन्यवाद आपली ही नाविन वेबसाईट आधुनिक आणि सर्व सोयींनी परिपूर्ण आहे आणि प्रत्येकाला संपूर्ण माहिती या द्वारे प्राप्त होईल व जास्तीत जास्त संबंध जुळण्यास मदत होईल मी या वेबसाइटचा सदस्य असुन इतरांनी सुध्दा सदस्य नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे. वेरूळकर परिवाराच्या या प्रयत्नाला सलाम आणि पाटील परिवारा तर्फे त्यांचे खुप खुप आभार आणि अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा मा.वेरूळकर यांच्या प्रयत्नाला यश प्राप्ती होवो व अधिकाधिक संबंध जुळावेत हीच गजानन चरणी प्रार्थना !

Suresh Ronghe Nagpur





आदरणीय श्री verulkar सर स.न.वी.वी. आपण वेबसाईट काढून एक फार महत्त्वाचे व समाजासाठी मोलाचे काम केले आहे. Advance technology वापरून काम करणे हि आता काळाची गरज आहे. आपण केलेल्या कार्यास माझ्या व माझ्या परिवाराकडून आपणास हार्दिक शुभेच्छा. आपला स्नहांकित: Suresh Ronghe Nagpur

काकडे पाटील परिवार



संभाजीनगर.



श्री.वेरुळकर सर नमस्कार ! सर आपण वधू-वरांसाठी वेबसाईट चालू केली हे उत्तमच झाले. आपल्या या कार्यास खुप खुप शुभेच्छा ! आपण हाती घेतलेले कार्य वृद्धींगत होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना ! - शुभेच्छुक- काकडे पाटील परिवार संभाजीनगर.

प्रा. तेजराव पाटील



गोंडपीपरी, जि. चंद्रपूर



आदरणीय,षडानन गुरुजी, काल आपण वेबसाईटचे उद्घाटन केले, त्याबद्दल आपले सर्व प्रथम हार्दिक अभिनंदन! सकल मराठा समाजासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. समाजकार्य बहुतांशी लोक करतात, पण आपण निवडलेला समाजसेवेचा हा मार्ग मात्र अफलातून आहे. संगणक आणि समाजसेवा.

M.R. SITRE HAFIZPETH TELANGANA HYEDRABAD





CONGRATULATIONS ABHINANDAN. YOU ARE TOPPER OF MARATHA COMMUNITY, MARATHA, SOSAITY.I AM PROUD OF ABOUT YOU AND YOUR FAMILY. LOT OF THANKS TO YOU. THANKS TO YOU AND YOUR FAMILY VERULKAR SIR. FROM M.R. SITRE HAFIZPETH TELANGANA HYEDRABAD 500049.

प्रा.दत्तात्रय भाकरे अकोला.





श्री वेरूळकर सर सप्रेम नमस्कार, नव्या युगाचा ,नवा शिपाई आज आपण सर्व मराठा बांधवांच्या उपवर मुला-मुलींचे लग्न जुळविणे सोपे व्हावे या करीता वेबसाईट सुरू केली त्याबद्दल आपले व कुटुंबियांचे अभिनंदन. ही बाब सर्व समाज बांधवांसाठी भुषणावह आहे या वेबसाईट वर मान्यवराच्या प्रतिक्रीया आपण प्रक्षेपित करता त्याचप्रमाणे सोयरीक लवकर जुळण्याच्या दृष्टीने काही प्रबोधनपर लेख प्रक्षेपीत करावे भाऊरावजी पाळेकर ,दिलीपजी पाटील दोघेही नेहमी आपल्या कार्याचे कौतूक करतात त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन .एखादी व्यक्ती "सेवा ही धर्म है " या उद्देशाने कार्य करत असेल तर ईतरांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याचे कौतूक करायलाच हवे. पुनश्च एकदा आपले अभिनंदन व हार्दीक शुभेच्छा आपला स्नेही. प्रा.दत्तात्रय भाकरे अकोला.

भाऊराव पाळेकर, अकोला





आदरणीय वेरूळकर सर, सप्रेम नमस्कार जीवनातील प्रत्येक दिवस व क्षण इच्छा आकांक्षा चे नवनवीन किरण सोबत घेऊन येत असतो" आणि एकदा का क्षणाचे महत्व कळाले की जीवनाचा उद्देश लवकरच सफल होतो. वर्तमान काळातील वर्तमान क्षण हेच खरे जीवन होय. ........आणि याचेच औचित्य साधुन आदरणीय वेरुळकर सरांनी अखेर ग्रुप मधील सर्व सभासदांच्या विनंतीस मान देऊन व त्यांच्या भावनांचा आदर करून " वेरुळकर सकल मराठा सोयरीक " पुसद जिल्हा यवतमाळ या नावाने नवीन वेबसाईट चा गुरुवार दिनांक १.१०.२०२० पासून सकाळी ०८ .०८ मिनिटांनी शुभारंभ केला आहे. त्या करिता सरांचे व त्यांचे कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा सुद्धा. धन्यवाद. भाऊराव पाळेकर, अकोला

दिलीप गुलाबराव पाटील,



अमरावती



अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन ! शेवटी शब्द खरा करुन दाखवला ।। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ।। श्री.षडानन रुपचंद वेरुळकर, भाऊसाहेब सप्रेम नमस्कार आपण सर्व सभासदांच्या भावनांचा आदर करून नवीन वेबसाईट- verulkarsakalmarathasoyrik.com दि. १/१०/२०२० गुरुवार ला सकाळी ८ वाजुन ८ मिनिटांनी सुरु केली त्या करीता सर्व प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन ! तसेच आपण हाती घेतलेल्या कार्यास मी व माझ्या परिवारा कडून हार्दीक शुभेच्छा ! आपल्या वेबसाईट ची अशीच दिवसे दिवस भरभराट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! धन्यवाद ! आपला शुभेच्छुक - दिलीप गुलाबराव पाटील, अमरावती

रमेश पाटील रा.चोंढी ता.पुसद जि.यवतमाळ





आदरणीय वेरुळकर सर सप्रेम नमस्कार, सरांनी जे ॠणानुबंधाचे जाळे विणले आहे त्या माध्यमातून दूर च्या नातेवाईका कडुन जवळच असलेल्या वेरुळकर सरांचा परिचय आला आणि राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक ग्रुप च्या माध्यमातून माझ्या मुलीचे तसेच मुलाचे सोयरीक संबंध जुळुन आले आहेत. त्याबद्दल मी व माझा परिवार आपला ॠणी व आभारी आहे. आपल्या कडुन अत्यंत मोलाचे समाजकार्य घडुन येत आहे. असेच भरीव समाजकार्य पुढील भविष्यकाळात देखील अखंड चालू राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. तसेच तुम्हाला उत्तम व उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना व पुढील वाटचाली करिता खुप खुप शुभेच्छा ! धन्यवाद ! जय जिजाऊ जय शिवराय

Page 4 of 15